राऊतांना तुरुंगाबाहेरच वातावरण मानवत नाही, तुम्हाला पुन्हा..; शंभूराज देसाईंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा उफाळून आला असून यामुळे राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनीही राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत याना सीमाप्रश्नावर बोलण्याचा अधिकार नाही. तुरुंगाबाहेरच वातावरण राऊतांना मानवत नाही असं म्हणत पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ देऊ नका असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले, राऊतांनी वादग्रस्त वक्तव्य थांबवावीत, अन्यथा त्यांना चोख उत्तर दिलं जाईल. त्यांना तुरुंगाबाहेरच वातावरण राऊतांना मानवत नाही असं वाटतंय. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यामुळे तुम्ही अशी वक्तव्य करणं टाळावं असं म्हणत शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांना सूचक इशारा दिला आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते-

कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून संजय राऊत आक्रमक झाले आहेत. आज महाराष्ट्राचे तुकडे होत असताना इथलं षंढ आणि नामर्द सरकार गप्प बसलंय? तुमच्यात दम असेल तर आधी दिल्लीला विचारा असं म्हणत संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली. तसेच आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वात कर्नाटकात जायला तयार आहोत असेही त्यांनी म्हंटल. त्यामुळे संजय राऊत विरुद्ध शिंदे फडणवीस सरकार असा सामना पुन्हा एकदा रंगला आहे.