हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशिया आणि युक्रेन यांच्यात मोठ्या प्रमाणात युद्ध सुरु आहे. या युद्धामध्ये आतापर्यंत सैन्यासह अनेक युक्रेनियन नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुसरीकडे युक्रेन देखील रशियाला चोख प्रतित्युत्तर देताना दिसून येत आहे. दरम्यान युक्रेन- रशिया युद्धावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्म्हमहत्वाची बैठक बोलवली असून यात नाटो आणि युरोपियन देश सहभागी होणार आहे. अशात युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मोठे विधान केले आहे. पुतीन यांच्याकडून माझ्या हत्येचे आदेश देण्यात आले असल्याचे झेलेस्की यांनी म्हंटले आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रशियाचे राष्ट्र अध्यक्ष पुतीन यांच्याकडून धमकी देण्यात आलेली आहे. माझ्या हत्येचे आदेश त्यांनी त्यांच्या सैनिकांना दिले आहेत. त्यामुळे युक्रेनसाठी आता चोवीस तास महत्वाचे आहेत, असे झेलेस्की यांनी विधान केले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रविवारी क्रेमलिन येथे महत्वाची बैठक घेतली. त्या बैठकीला सुमारे 13 अब्जाधीश उपस्थित होते. पुतिन व्यावसायिकांशी बोलताना म्हणाले की, ‘जे घडत आहे तो आवश्यक उपाय आहे. आमच्यासाठी याशिवाय कोणतीही संधी उरली नाही. दरम्यान त्यांनी आता थेट झेलेस्की याच्या हत्येचे आदेश दिले असल्याने युक्रेनची चिंता अधिक वाढली आहे.