Volvo XC40 Facelift : Volvo XC40 फेसलिफ्ट भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Volvo इंडियाने आज (Volvo XC40 Facelift) आपली लक्झरी कार XC40 चे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लॉन्च केलं आहे. या कारची किंमत 43.20 लाख रुपये आहे. फ्यूजन रेड, डेनिम ब्लू, क्रिस्टल व्हाइट पर्ल, ग्लेशियर सिल्व्हर आणि पाइन ग्रे या रंगांच्या पर्यायांमध्ये ही suv तुम्ही खरेदी करू शकता. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे काही खास फीचर्स …

फीचर्स –

Volvo च्या या SUV ला 14-स्पीकर हार्मन (Volvo XC40 Facelift) कार्डन साउंड सिस्टम, PM 2.5 फिल्टरसह एक नवीन एअर-क्लीनर, वायरलेस फोन चार्जिंग, इलेक्ट्रिकली फोल्ड करण्यायोग्य मागील सीट हेडरेस्ट, पायलट असिस्ट, अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन किपिंग असिस्ट, ट्रॅक्शन देखील मिळते. याशिवाय इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम, हिल डिसेंट कंट्रोल, आठ एअरबॅग्ज आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टीम यासारखी कंट्रोल फीचर्स या गाडीमध्ये देण्यात आली आहेत.

Volvo XC40 Facelift

इंजिन – (Volvo XC40 Facelift)

नवीन Volvo XC40 फेसलिफ्टमध्ये माइल्ड (Volvo XC40 Facelift) हायब्रिड 2.0-L टर्बो-पेट्रोल इंजिन वापरण्यात आले आहे, जे 197bhp पॉवर आउटपुट आणि 300Nm टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, ही कार 48V इलेक्ट्रिक मोटरसह माइल्ड -हायब्रिड प्रणालीशी जोडलेली आहे. या कारमध्ये ऑल व्हील ड्राइव्ह सिस्टिम उपलब्ध आहे. तसेच या SUV मध्ये 8-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा सपोर्ट देण्यात आला आहे.

Volvo XC40 Facelift

किंमत –

गाडीच्या किमतीबाबत बोलायचं झाल्यास, या SUV ची किंमत बाजारात सध्या 43.20 लाख रुपये आहे. ही किंमत फक्त सध्याच्या सणासुदीच्या काळासाठी आहे, त्यानंतर मात्र गाडीची किंमत 45.90 लाख रुपये केली जाईल.

हे पण वाचा :

Flying Bike : अबब!! हवेत उडणारी बाईक; 100 किमी प्रतितास वेग

Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

Mahindra XUV400 : 456 किमी रेंज अन् 150 किमी टॉप स्पीड; Mahindra XUV400 चे दमदार फीचर्स पहाच

Tata Nexon EV Jet : Tata Nexon EV जेट एडिशन भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये