विशेष प्रतिनिधी । आज संपूर्ण राज्यात विधानसभा जागांसाठीचे निवडणूक निकाल जाहीर होत आहेत. देशाचे संविधान प्रत्येक मतदाराला निवडणुकीत आपला उमेदवार निवडण्याचा जसा अधिकार आहे. त्याप्रमाणे उमेदवार नाकारण्याचा सुद्धा अधिकार ‘नोटा’ बटनामुळे मतदाराला मिळतो. याच नोटा बटणाचा सर्वाधिक वापर यंदाच्या निवडणुकीत वापरल्याचा एक आश्चर्यकारक आकडा आता समोर आला आहे.
राज्यातील ३ मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदारांनी नोटा चा उपायोग केला आहे. त्यापैकी लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये तब्बल १६ हजार मतं, बोरिवली मतदारसंघात १० हजारातून अधिक मतं तर, पलुस-कडेहगाव मतदारसंघात २० हजार मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे.