गोंदियात होळीकरता कोट्यावधींच्या झाडांची कत्तल..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२० ठिकाणी खासगी होळ्या

गोंदिया प्रतिनिधी 

होळी म्हंटल की लाकडं आणि गौऱ्या या आल्याच, त्या जाळून अनिष्ट वृत्ती जाळून सण साजरा करायचा हा एक भारतीय संस्कृतीचा भाग. परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने भारतात कोणत्या सणांना किती महत्व द्यावं याच मूल्यमापन होणं आधुनिक काळाची गरज बनत जात आहे. लाकडं जाळल्याने होणारी हानी ही पृथ्वीवरील मोठी हानी सहसा भरून निघणारी नसते. आपणच पर्यावरणाचे रक्षक बनण्याऐवजी भक्षक बनत जात आहोत. होळीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी वृक्ष कत्तली होतात. त्यांची आकडेवारी सहजाहजी समोर येत नाही.

गोंदिया मध्ये अशाच वृक्षतोडी मुळे मोठं संकट निर्माण झाले आहे. या निमित्ताने ग्लोबल वोर्मिंगचा धोका वाढत चालला आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर सारखा घनदाट जनगल अशी ओळख असलेल्या गोंदिया ची ओळख या निमित्ताने पुसली जाण्याची शक्यता आहे.

या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत. यंदा होळीला जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२० ठिकाणी खासगी होळ्या जाळल्या जात आहेत. यातील २८०७ होळींमध्ये २८ हजार ७० क्विंटल लाकडे जाळले गेली आहेत. या लाकडांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या जवळपास आहे. होळीचा सण शांततेत आणि निर्भय व मोकळ्या वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस दलातर्फे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे

 

Leave a Comment