वाई नगरपरिषद : राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांची नगराध्यक्षपदी वर्णी, तिर्थक्षेत्र आघाडीत आनंदोत्सव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वाई | वाईचे नगराध्यक्षपद नियमानुसार आज राष्ट्रवादी पुरस्कृत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे उपनगराध्यक्ष अनिल सावंत य‍ांनी स्विकारले. भाजपच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डाॅ. प्रतिभा शिंदे यांच्या अपात्रेमुळे उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अातिषबाजी करित आनंदोस्तव साजरा केला.

भारतीय जनता पक्षातून निवडून आलेल्या वाईच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांना लाच घेतल्याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर उर्वरित कालावधीसाठी नगराध्यक्षपदावरून दूर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगरविकास विभागाच्या राज्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाचा पदभार नियमानुसार उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्विकारला. मुख्याधिकारी रजेवर असल्याने कार्यालयीन अधिक्षक नारायण गोसावी यांनी त्यांना नगराध्यक्षपदाचा पदभार सुपूर्द केला.

नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आल्याने सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये जल्लाषाचे वातावरण पसरले आहे. यावेळी आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, नगरसेवक प्रदिप चोरगे, चरण गायकवाड, भारत खामकर, किशोर बागल, राजेश गुरव, संग्राम पवार, दिपक अोसवाल, अँड. श्रीकांत चव्हाण, कांताराम जाधव, सिमा नायकवडी, शितल शिंदे, स्मिता हगीर, रेश्मा जायगुडे, प्रियंका डोंगरे, आरती कांबळे, मनिष भंडारे, अजित शिंदे, अशोकराव सरकाळे, विकास जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment