बैलगाडा शैर्यतीला 400 वर्षांची परंपरा; शर्यती पुन्हा सुरु होण्याकरता बैलाला संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे – कोल्हे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वपूर्ण ठेवा असणाऱ्या बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु व्हाव्यात यासाठी बैल या प्राण्यास संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार ड़ॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे केली आहे.

बैल या प्राण्याचा संरक्षित दर्जा काढून घेण्यात यावा यासाठी कोल्हे यांनी सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. बैलगाडा शर्यत नेमकी काय, ती कशी आयोजित केली जाते, बैलगाडा शर्यतीतून कशाप्रकारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते, बैल मालक बैलांची कशी काळजी घेतात याविषयी श्री. रुपाला यांच्यासोबत अमोल कोल्हे यांनी चर्चा करत बैलगाडा शर्यतीला ४०० वर्षांची परंपरा असून ती टिकणे महत्त्वाचे आहे असे अमोल कोल्हे यांनी म्हंटल.

बैलगाड्या शर्यत बंद झाल्यामुळे बैलांच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे देशी गोवंश जतन करण्यासाठी, आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू होणे गरजेचे आहे, अशी माहिती पुरुषोत्तम रुपाला यांना कोल्हे यांनी दिली.

वाघ, सिंह, अस्वल, माकड या संरक्षित जंगली प्राण्यांच्या यादीत पाळीव प्राणी असलेल्या ‘बैल’ प्राण्याचा समावेश झाल्यामुळे देशी खिलार जातीच्या बैलांचा वंश नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्याचबरोबर बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला असून बारा बलुतेदारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापार पूर्णतः थांबल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Leave a Comment