CNG Cars Under 10 lakhs : देशात पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. अशा वेळी जर तुम्ही नवीन CNG कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. कारण आता तुम्ही 10 लाखांपेक्षा कमी किमतीत येणाऱ्या या 4 खरेदी करू शकता. या कार 10 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत येतात. जाणून घ्या सविस्तर यादी…
टाटा पंच
टाटा पंच या कारमध्ये 1.2 लीटर इंजिन आहे. ही कार CNG वर 26.99 kmpl चा उच्च मायलेज देते. ग्लोबल NCAP क्रॅश चाचणीमध्ये कारला 5 स्टार रेटिंग मिळाले आहे. ही कार सीएनजीमध्ये 7.09 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन दिले जात आहेत. तुमच्या छोट्या परिवारासाठी ही एक उत्तम कार आहे.
Dzire VXi CNG
या कारचे Dzire VXi CNG मॉडेल 8.39 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये आहे. यात 1197 cc चे पॉवरफुल इंजिन आहे. ही कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते. ही कार CNG वर 31.12 किमी/किलो मायलेज देते. व 76 bhp पॉवर जनरेट करते. त्याच वेळी, कंपनी कारचे Dzire ZXi CNG मॉडेल 9.07 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत ऑफर करत आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होणारी ही कार आहे.
ह्युंदाई ऑरा
ही कार CNG वर 68 bhp चा पॉवर देते. कारचे बेस मॉडेल 8.23 लाख रुपये एक्स-शोरूममध्ये दिले जात आहे. कारमध्ये 1197 सीसीचे शक्तिशाली इंजिन आहे. कारमध्ये सीट बेल्ट रिमाइंडर, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि मागील पार्किंग सेन्सर यांसारखी उत्तम सुरक्षा वैशिष्ट्ये आहेत. हे फ्रंट ड्रायव्हर केबिन आणि मागील सीट दोन्हीमध्ये एअरबॅगसह येते.
टोयोटा ग्लान्झा
या कारमध्ये 360 डिग्री कॅमेरा, क्लायमेट कंट्रोल, एलईडी हेडलाईट आणि टेललाइट सारख्या स्मार्ट लक्झरी फीचर्स देण्यात आल्या आहेत. ही हॅचबॅक कार डॅशिंग लुकसह 16 इंची अलॉय व्हील्समध्ये देण्यात आली आहे. कारचे CNG मॅन्युअल ट्रान्समिशन 8.60 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये 1197 cc चे पॉवरफुल इंजिन आहे. तसेच Toyota Glanza CNG या कारला 30.61 kmpl मायलेज आहे.