दिवाळीची स्वस्त दरात खरेदी करायचीये? तर पुण्यातील या मार्केटला नक्की भेट द्या

pune market
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दिवाळी म्हणलं की खरेदी आलीच. परंतु सध्या या दिवाळी सणामुळे बाजारातील वस्तूंचे भाव एवढे वाढले आहेत की, ते ग्राहकांना परवडण्याच्या बाहेर गेले आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पुण्यातील असे काही मार्केट सांगणार आहोत. जिथे तुम्हाला योग्य दरात प्रत्येक एका वस्तूची खरेदी करता येईल. याठिकाणी तुम्हाला दिवाळी सणासाठी लागणारे सर्व सामान योग्य दरात मिळेल. चला तर मग जाणून घेऊयात पुण्यातील ही खास मार्केटस्…

1) तुळशीबाग – पुण्याचं नाव घेतलं की आपल्याला पहिली तुळशीबाग आठवतेच. याच तुळशीबागेत प्रत्येक सणाला लागणारे सामान मिळते. सर्वात स्वस्त दरात काही घ्यायचे असेल तर तुळशी बाग हा सर्वात बेस्ट पर्याय आहे. याठिकाणी तुम्हाला दिवाळीचे सर्व सामान मिळून जाईल. पणत्या, लाईट, कंदील, दागिने, कपडे, चप्पल, रांगोळी अशा सर्व वस्तू तुळशी बागेत मिळतील. येथे आपल्यावर फक्त आपल्याला बर्गेनिंग करता आलं पाहिजे.

2) लक्ष्मी रोड – लक्ष्मी रोड म्हणजेच पुण्यातील खरेदीसाठी सर्वात योग्य जागा. याठिकाणी तुम्ही दिवाळीत खरेदीसाठी गेला तर तुम्हाला पाय ठेवायला देखील जागा मिळणार नाही. परंतु याचं रोडवर तुम्हाला हव्या असलेल्या सर्व वस्तूंची दुकाने सहज मिळतील. सोने खरेदी करायचे असो वा घरात लागणारे सामान घ्यायचे असो. लक्ष्मी रोड वर सगळं मिळून जाईल.

3) FC रोड – दिवाळीत वा तुम्हाला इतर फंगशनसाठी कपडे खरेदी करायचे असतील तर तुम्ही एफसी रोडला नक्की भेट द्या. यासाठी तुम्हाला हवे असणारे प्रत्येक प्रकारचे कपडे मिळतील. तसेच, इतर काही खरेदी करायची असेल तर ते दुकाने देखील या रोड वर दिसतील.

4) कॅम्प – पुण्यात खरेदीची आणखीन एक उत्तम जागा म्हणजे कॅम्प. कॅम्पमध्ये गेल्यानंतर तुम्ही कधीच रिकाम्या हाती येऊ शकणार नाही. याठिकाणी तुम्हाला दिवाळी सणासाठी लागणारे सर्व सामान योग्य दरात मिळून जाईल. तसेच, कपडे देखील स्वस्त दरात मिळतील. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत कॅम्पमध्ये नक्की खरेदीसाठी जावा.

5) MG Road – यासाठी तुम्हाला दिवाळीसाठीच नव्हे तर इतर ही काही सामान खरेदी करायचे असेल तर ते सहन मिळून जाईल. MG रोडवर तुम्हाला कपडे, चप्पल, एर्रिंग, जीन्स, अशा सर्व वस्तू योग्य दरात मिळतील. दिवाळीत तर MG रोड पूर्णपणे गजबजलेला असतो. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही खरेदीसाठी नक्की याठिकाणी जावा.