हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | घराच्या किंमती ह्या दिवसेंदिवस वाढत असताना देखील स्वतःच्या हक्काचे घर घेण्यासाठी जो तो धडपडताना दिसत आहे . सध्याची वाढती महागाई पाहता प्रत्येकालाच घर घेणे परवडेल असे नाही. पण तरीही घराच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढली तरी घर घेण्यासाठी उत्सुक असलेला प्रत्येकजण जास्त किंमतीचे गृहकर्ज मिळवण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवत आहे. त्यासाठी आम्ही काही मार्ग सुचवत आहोत त्या मार्गाचा जर तुम्ही अवलंब केला तर कदाचित तुम्हालाही जास्त किंमतीचे गृहकर्ज उपलब्ध होऊ शकते.
गेल्या काही कालावधीपासून आरबीआय (rbi) ने रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे, ज्यामुळे गृहकर्जावरील व्याजदर पूर्वीपेक्षा जास्त झाला आहे. व्याजदरात वाढ झाल्यामुळे गृहकर्जासाठी पात्र असलेल्यांच्या संख्येतही घट झाली आहे. शिवाय गृहकर्जावर जास्त रक्कम मिळण्यातही अडचण निर्माण झाली आहे. अशातच जर तुम्हाला अधिक रकमेचे गृहकर्ज मिळवायचे असेल ? तर तुम्ही ह्या पाच मार्गांचा अवलंब करू शकता.
1) क्रेडिट स्कोअर उत्तम असावा
जर तुमचा क्रेडिट स्कोर उत्तम असेल तर तुमचा क्रेडिट स्कोअर तुम्हाला स्वस्त दरात जास्त गृहकर्जाची रक्कम मिळवून देऊ शकतो. SBI ते HDFC बँक ग्राहकाच्या क्रेडिट स्कोअरवर गृहकर्जाची रक्कम देतात. तज्ञांच्या मते, चांगला क्रेडिट स्कोअर तुम्हाला गृहकर्जावर कमी व्याजदर मिळवून देतो
2) कर्ज फेडण्यासाठी मिळणारा अधिक कालावधी
जर तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी अधिक कालावधी मिळाला तर कर्जाचा कालावधी वाढवल्याने गृहकर्जाचा EMI कमी होतो आणि तुम्हाला जास्त कर्जाची रक्कम मिळू शकते. तुम्ही बँकेला कर्जाचा कालावधी वाढवण्यास सांगू शकता.
3) कर्ज घेण्यासाठी आणखी एका व्यक्तीला सोबत घेऊन एकत्रितपणे कर्ज काढणे
तुम्ही कर्ज काढण्यासाठी तुमच्यासोबत इतर कोणत्याही व्यक्तीचा समावेश केल्यास, तुम्हाला जास्त कर्जाची रक्कम मिळू शकते. बँकेला खात्री आहे की जास्त कर्जाची रक्कम दोन व्यक्ती परतफेड करू शकतात. परंतु त्यापूर्वी बँक दोन्ही कर्जदारांच्या पात्रतेची पडताळणी करेल.
4) डाउनपेमेंट वाढवणे-
कर्ज घेण्यासाठी डाउनपेमेंट देण्याची हि पद्धतही फायदेशीर ठरू शकते . जर तुम्ही डाउनपेमेंटची रक्कम वाढवली तर तुम्हाला जास्त कर्जाची रक्कम मिळू शकते. डाउनपेमेंट केल्याने तुमचा EMI देखील कमी होईल आणि कर्जाचा कालावधी देखील कमी होईल.
5) सद्य सुरु असलेले कर्ज कमी करा-
जर तुमच्याकडे कर्ज आणि क्रेडिट कार्डचे कर्ज थकीत असेल, तर सर्वप्रथम तुम्ही ते त्वरित कमी करा आणि यानंतर तुम्ही नवीन कर्जासाठी अर्ज करु शकता ज्यावर तुम्हाला बँकेकडून कर्जाची चांगली रक्कम दिली जाईल. अशा प्रकारे वरील 5 मार्गाचा अवलंब केल्यास तुम्हाला जास्तीत जास्त गृहकर्ज मिळू शकते.