खाजगी रुग्णालयातून लसीकरण करायचंय? पहा काय आहेत लसींचे दर?

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात करोनाची रुग्ण संख्या ही झपाट्याने वाढत आहे त्यामुळे देशात लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. एवढेच नाही तर अनेक राज्यांमध्ये देखील मोफत लसीकरण करण्यात येत आहे. सध्या नागरिकांना मोफत लसीकरण करून घेण्यासाठी वेटिंग करावे लागत आहे मात्र खाजगी रुग्णालयांमध्ये जर तुम्ही लसीकरण करण्यासाठी विचार करत असाल तर खाजगी रुग्णालयांमध्ये लसीचे काय दर आहेत याची माहिती जाणून घेऊया…भारतात सध्या भारत बायोटेकची कॅव्हॅक्सिन , सिरम इन्स्टिटयूटची कॅव्हिडशील्ड लस प्राधान्याने दिली जात आहे.

खाजगी रुग्णालयामध्ये लसीच्या किंमतीची सुरुवात 250 रुपयांपासून झाली होती. त्यानंतर मात्र आता खाजगी रुग्णालयांच्या लसींच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. भारतात खाजगी रुग्णालयांमध्ये लसींची किंमत 700 ते 1500 पर्यंत आहे. महत्त्वाची बाब अशी की ही किंमत इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

कोविडशिल्ड

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ने तयार केलेल्या कॅव्हिडशील्ड लसीचा डोस जर घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला प्रति डोस खाजगी रुग्णालयांमध्ये 700 ते 900 रुपये खर्च करावे लागतील. हाच डोस सिरम कंपनी सरकारला तीनशे रुपये यामध्ये देण्याचे ठरले आहे.

कोव्हॅक्सीन

भारत बायोटेक या कंपनीने तयार केलेल्या कॅव्हॅक्सिन लसीचे जर तुम्ही डोस घेण्याचा विचार करत असाल तर देशातील चार सर्वात मोठे कार्पोरेटर रुग्णालयांचे गट खाजगी क्षेत्राचा लसीकरणाचे काम करत आहेत यात अपोलो, मॅक्स, फोर्टिस आणि मणिपाल या रुग्णालयांचा समावेश आहे. कोवॅक्सिन लसीचा दर हा 1500 रुपयांपर्यंत आहे.

मॅक्स रुग्णालयाच्या प्रवक्त्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार जीएसटी आणि वाहतुकीचा खर्च मिळून covid-19 लसीसाठी 660 ते ६७० रुपये खर्च येतो यातील पाच ते सहा टक्के लस निरुपयोगी होत आहे. त्यामुळे प्रत्येक लसीच्या डोसची किंमत जवळपास 7१० ते 715 रुपये आहे. या लसीचे शुल्क म्हणून 170 ते 180 रुपये आकारले जात आहेत. यात कर्मचाऱ्यांसाठी पीपी किट, बायोमेडिकल कचऱ्याची विल्हेवाट, किंमत 900 रुपये इतकी होते.
सध्यासंपूर्ण देशात लसीचा तुटवडा जाणवतो आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 26 मे पर्यंत को बीड शेड लस उपलब्ध होणार नाही अशी माहिती दिली आहे.

कोव्हिशील्ड

रुग्णालय शहर लसीची किंमत

एच एन रिलायन्स मुंबई 700 रुपये
अपोलो दिल्‍ली, अहमदाबाद, चेन्‍नई, हैदराबाद, कोलकाता 850 रुपये
मॅक्‍स दिल्‍ली, गुरुग्राम, मुंबई 900 रुपये

कोव्हॅक्सिन

रुग्णालय शहर लसीची किंमत

यशोदा रुग्णालय हैदराबाद 1,200 रुपये
फोर्टिस दिल्‍ली, गुरुग्राम, नोएडा, जयपूर 1,250 रुपये
अपोलो हैदराबाद, चेन्‍नई 1,250
एचएन रिलायंस मुंबई 1,250 रुपये
मनिपाल गोवा, बेंगलुरु 1,350 रुपये
बीजीएस ग्‍लेनलीस रुग्णालय बेंगलुरु 1,500 रुपये
वूडलैंड्स रुग्णालय कोलकाता 1,500 रुपये

You might also like