नवी दिल्ली । बचतीचा पहिला पर्याय म्हणजे बँक FD (Fixed Deposit) कारण गुंतवणूकीसाठी हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. अशा परिस्थितीत आपण कोणत्याही बँकेत फिक्स्ड डिपॉझिट (FD) घेण्याची योजना आखत असाल तर सर्व बँकांच्या व्याजदराबद्दल आपण पहिले माहिती घेतली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला HDFC बँकेच्या एफडीवरील व्याजदराबद्दल माहिती देत आहोत.
एचडीएफसी बँक आपल्या ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या मुदतीच्या कालावधीत फिक्स्ड डिपॉझिट (FD) सुविधा देते. याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक ज्येष्ठ नागरिकांना FD (Fixed Deposit) वर अतिरिक्त व्याज देखील देते. सर्वसामान्यांच्या तुलनेत बँक सीनियर सिटिजन्सना 0.5% जादा व्याज देत आहे.
येथे नवीन दर :
>> 7 ते 29 दिवस – 2.50%
>> 30 ते 90 दिवस – 3%
>> 91 दिवस ते 6 महिने – 3.5%
>> 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी – 4.4%
>> 9 महिने ते 1 वर्ष – 4.9%
>> 1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपर्यंत – 4.9%
>> 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपर्यंत – 5.15%
>> 3 वर्षांपेक्षा जास्त आणि 5 वर्षांपर्यंत – 5.30%
>> 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंत – 5.50
ज्येष्ठ नागरिकांना ‘या’ सर्व FD वर 0.5% अधिक व्याज
1 वर्ष ते 2 वर्षात मॅच्युर होणाऱ्या FD वर 4.9%, 2 वर्ष ते 3 वर्षात मॅच्युर होणाऱ्या FD वर 5.15%, 3 वर्ष ते 5 वर्षांच्या कालावधीत मॅच्युर होणाऱ्या FD वर 5.30% आणि 5 वर्ष ते 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीच्या FD वर आता 5.50 % व्याज दिले जात आहे. या सर्व FD वर ज्येष्ठ नागरिकांना 0.5% अधिक व्याज मिळते. यापूर्वी HDFC ने नोव्हेंबर 2020 मध्ये व्याज दरात बदल केला होता.
बँकेने मोबाइल ATM सर्व्हिस सुरू केली
HDFC बँकेच्या मोबाइल ATM सर्व्हिस द्वारे ग्राहक कॅश काढणे, ATM पिन नंबर बदलणे, प्रीपेड मोबाइल रिचार्ज करणे, वीज किंवा अन्य युटिलिटी बिले भरणे यासह 15 प्रकारच्या सर्व्हिस मिळवू शकतात.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा