अभिनेता शिवम पाटीलने केली ‘या’ अभिनेत्रीविरुद्ध पोलिसांत तक्रार; मानसिक व शारीरिक शोषणाचा लावला आरोप
हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठमोळा अभिनेता शिवम पाटील याने छोट्या पडद्यापासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर आता तो बॉलिवूडमध्ये आपली जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. साधारण तीन वर्षांपूर्वी अय्यारी या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात त्याने एक लहानशी भूमिका साकारली होती. मात्र हि भूमिका समिक्षकांना आणि प्रेक्षकांना फार आवडली होती. यापुढे तो एका योग्य आणि चांगल्या संधीच्या प्रतीक्षेत होता. मात्र नशिबाचे चक्र फिरावे तसे त्याचे दिवस बदलले. अभिनेत्री मेधा शंकरन आणि इतर दोन महिलांनी त्याच्यावर केलेल्या आरोपानंतर त्याला अचानक काम मिळेनासे झाले. यामुले गेल्या काही दिवसांपासून शिवम नैराश्याचा सामना करत होता. मात्र आता त्यांच्या आरोपांना उत्तर देत शिवमने आपबीती सांगितली आहे.मात्र यावेळी केवळ सहन न करता त्याने या विरुद्ध आवाज उठवीत थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे आणि मुंबई पोलिसांनी हि तक्रार नोंदवूनही घेतली आहे. याबाबत लवकरच पुढील कारवाई होणार आहे.
त्याने ही पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. यात त्याने लिहिले कि, मेधा सतत माझा अपमान करायची. मेधा आणि माझं रिलेशनशिप अत्यंत टॉक्सिक होतं. ती सतत माझ्यावर विनोद करायची. तिने अनेकदा माझे मानसिक आणि शारिरीक शोषण केले आहे. ज्या गोष्टींशी माझं भावनिक नातं होतं अशा गोष्टी तिने माझ्या डोळ्यांसमोर नष्ट केल्या. मी त्रस्त होतो. पण तिच्याबाबत मी कोणाकडे तक्रारही करु शकत नव्हतो. कारण मला माझे करिअर संपण्याची भीती वाटत होती. ती भीती मेधानच माझ्या मनात निर्माण केली होती.
पुढे, एकेदिवशी अखेर या त्रासातून मुक्त होण्याचा निर्णय मी घेतला. तिच्या पासून वेगळा झालो.पण तरी देखील तिने मला त्रास देणे सोडले नाहीच. मी आमच्या नात्याविषयी बाहेर कुठेही काही बोललो किंवा कुठे तक्रार केली तर माझे करिअर संपवण्याची तशी अप्रत्यक्ष धमकीच तिने मला दिली होती. गेली दोन वर्ष मी याच कारणामुळे नैराश्येत होतो.
आत्महत्या करण्याचा विचारही माझ्या मनात अनेकदा येऊन गेला आहे. असे म्हणत शिवमने स्वतःची होणारी घुसमट अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली. अनेक चुकीच्या रुमर्समूळे त्याचे जगणे अशक्य झाले आहे. अगदी विकिपीडियापासून ते सोशल ऍक्टिव्हर्स सगळ्यांनी त्याच्या खाजगी आयुष्याबाबत सांगितलेल्या अनेक गोष्टी चुकीच्या व खोट्या आहेत असे त्याने म्हटले आहे. इतकेच नव्हे तर शिवमने या प्रकरणी मुंबई पोलीसत दाखल केलेल्या कायदेशीररित्या तक्रारीनुसार सायबर सेलनेही गुन्हा नोंदवून घेतला आहे. या बाबींवर पोलीस तपास करीत असून या प्रकरणी संबंधितांना पोलिसांच्या कडक कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. या केस संदर्भात लवकरात लवकर पोलीस कारवाई व्हावी अशी शिवमने पोलिसांना विनंती केली आहे.