हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लाखोंपेक्षा अधिक गरीब कुटुंब रेशन कार्डवर मिळणाऱ्या धान्यावर आपला उदरनिर्वाह भागवतात. रेशन कार्डमार्फतच (Ration Card) पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचे धान्य मिळवता येते. थोडक्यात सांगायचे झाले तर, हे रेशन कार्ड सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्वाधिक फायदेशीर ठरते. तसेच हे रेशन कार्ड विविध कामांसाठीही उपयोगी पडते. त्यामुळे ऑनलाइन सोप्या पद्धतीने रेशन कार्ड कसे काढावे? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ऑनलाइन रेशन कार्ड कसे काढावे?
- सर्वात प्रथम https://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx या वेबसाईटवर जावा.
- यानंतर तुम्हाला तुमचे आयडी लॉग इन करून घ्यावे लागेल.
- आयडी लॉग इन झाल्यानंतर Apply online for ration card यावर क्लिक करा.
- पुढे, ID Proof साठी विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे जोडा.
- विचारण्यात आलेली सर्व माहिती आणि शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट देण्यात येईल.
- ही प्रक्रिया झाल्यानंतर तुम्ही भरलेली सर्व माहिती खरी असल्यास आणि त्या माहितीचे पडताळणी झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.
शुल्क किती आकारले जाईल?
- नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी 50 ते 100 रुपये शिल्पा करण्यात येईल. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर तुम्हाला हे रेशन कार्ड 30 दिवसांमध्ये उपलब्ध होईल.
- 30 दिवसांपर्यंत रेशन कार्ड आले नाही तर पुन्हा डिपार्टमेंट ऑफ फूडच्या वेबसाइटवर जा.
- त्यानंतर Citizen Corner वर क्लिक करा.
- पुढे Track Food Security Application वर क्लिक करा.
- त्यांनतर पुढील चारी पर्याय भरा.
- यानंतर तुम्ही अर्जाची स्थिती पाहू शकता.
शैक्षणिक कामासाठी तसेच उत्पन्नाचा दाखला बनवताना देखील रेशन कार्ड मागितले जाते. परंतु हे रेशन कार्ड फक्त भारताचे नागरिक असलेल्या लोकांनाच काढता येते. हे रेशन कार्ड 18 वर्षानंतर काढता येते. या रेशन कार्ड मध्ये 18 वर्षाखालील कमी वयोगटातील मुलांची नावे ही टाकता येतात.