हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शेतकरी रात्रीच्यावेळी शेतात पाणी पाजण्यासाठी जातात. अशावेळी रात्रीच्या अंधारात त्याच्यावर वन्य प्राण्यांकडून हल्ले होण्याची भीती असते. ते शेतात पिकांचे तसेच स्वतः चे वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी शेतकरी लाकडी मचाण तयार करून त्यात राहतात. मात्र, वर्धा जिल्ह्यातील एका शेतकरी पुत्राने शक्कल लढवत अनोखे असे मचाण तयार केले आहे. त्यामध्ये सर्व सुविधा त्याने केल्या आहेत.
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील कासारखेडा येथील योगेश माणिक लिचडे हा युवा शेतकरी. योगेशने त्याच्या घरी शेती असल्याने तो रात्रीच्यावेळी शेतात पाणी पाजण्यासाठी जात असे. यावेळी रात्रीत थंडीत जमिनीवरच झोपावे लागे.
शेतकरी मित्रांनो, शेती करताना आपण अनेक तंत्रज्ञानाचा वापर करत असतो. त्यासाठी अनेक यंत्रे, उपकरणे आपण वापरतो. त्याच्या माध्यमातून आपण शेतीतील कामे सोप्या पद्धतीने करू शकतो. तुम्हाला नवीन तंत्रज्ञान, उपकरणे याची माहिती तसेच कृषी विद्यापीठांमधील नवनवीन संशोधनाची माहिती हवी असेल तर Hello Krushi हे ॲप गुगल प्ले स्टोअर वर जाऊन Download करून Install करा. याव्यतिरिक्त Hello Krushi मध्ये तुम्हाला थेट नवीन उपकरणे तयार करणाऱ्या तसेच शेतीत प्रयोग करणाऱ्या इतर शेतकऱ्यांसोबत संपर्क साधता येईल. त्यासाठी Hello Krushi डाउनलोड करा.
Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here
काही दिवसांपुर्वी रात्री शेतात थांबलेल्या शेतकऱ्याला बिबट्याने फरफटत नेल्याचे त्याने ऐकले. त्याने आपल्या शेतात उंच असे मचाण बांधण्याचा निर्णय घेतला. शेतात काम करताना शेतकऱ्यांचा वन्यजीव आणि पाऊस, वीज यापासून बचाव व्हावा यासाठी योगेशने कल्पकतेने मचाण तयार केले. हे मचाण त्याच्यासाठी नक्कीच सोयीच ठरत आहे.
वर्ध्यातील शेतकरीपुत्राची भन्नाट कल्पना; शेतात बनविले सुविधायुक्त मचाण pic.twitter.com/tYv8EGxCfL
— santosh gurav (@santosh29590931) January 29, 2023
योगेशच्या मचाणमध्ये आहेत ‘या’ सुविधा
योगेशने मचाण तयार करताना उंचीवर केले आहे. मचाणची उंची 5 ते 6 फूट उंच आणि वजन जवळपास 550 किलो आहे. यावर विद्युतरोधक लावण्यात आले आहे. वरील भागावर सोलर पॅनलही लावला आहे. सोलरवर ऑपरेटिंगवर पंखा, लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. मचाणमध्ये रेडिओसारखी मनोरंजनाची तसेच मोबाईल चार्जिंगचीही सुविधा केली आहे. मचाणमध्ये दोन जण आरामात थांबू शकतात. यास झुलादेखील लावला आहे.
मचाण निर्मितीतून मिळाला व्यवसायाचा मार्ग
योगेशने स्वतःसाठी मचाण तयार केले. त्याच्या शेतात मचाण पाहून गावातील शेतकऱ्यांनी देखील त्याला त्याच्या शेतात मचाण तयार करू देण्याची मागणी केली. हळू हळू त्याच्या मंचांची चर्चा पंचक्रोशीत झाली. आता बाहेरून त्याचा हा मचाण पाहण्यासाठी शेतकरी त्याच्या शेतात येत आहेत. शिवाय काहींनी तर त्याला मचाण करून देण्याची मागणीही केली आहे.
वन्यजीव, नैसर्गिक आपत्तीपासून मचाण ठरतेय वरदान
योगेशने तयार केलेल्या या मचाणमुळे शेतकऱ्यांचा शेतात काम करताना वन्यजीव आणि नैसर्गिक आपत्तीपासून बचाव होणार आहे. हे मचाण शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. योगेशने मचाणकरीता लोखंडी तसेच आवश्यक साहित्याचा वापर केला आहे. भविष्यात कमी खर्चात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे योगेशने सांगितले आहे.