वर्ध्यात हेल्मेट न वापरणाऱ्या ३३० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वर्धा प्रतिनिधी । नागपूर मार्गावरील पवनार शिवारात वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने नाकेबंदी करीत ४८ तासांत तब्बल ३३० दुचाकी चालकांवर वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे.

वर्धा वाहतूक नियंत्रण शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने वर्धा-नागपूर मार्गावरील पवनार शिवारात नाकेबंदी करीत वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न केल्याचा ठपका ठेवत दंडात्मक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे याच मार्गावर काही दिवसांमध्ये सतत अपघात झालेत. यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले.

वाहन चालविताना सदर व्यक्तींनी हेल्मेटचा वापर न केल्याचेही या दोन्ही विभागांच्या लक्षात आल्याने या मार्गावर हेल्मेट सक्तीबाबतची ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. सदर मोहीम सतत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.