बंडातात्या कराडकर यांच्यासाठी सलग 12 तास महामृत्युंजयचा जप

Bandatatya Karadkar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ कीर्तनकार व व्यसनमुक्ती युवक संघाचे संस्थापक ह.भ.प बंडातात्या कराडकर यांना पक्षाघातामुळे पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, आजही ह.भ.प बंडातात्या कराडकर हे रुग्णालयातच असल्याने त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून सोळशी (ता. कोरेगाव) येथे सलग 12 तास महामृत्युंजय मंत्राचा अखंडपणे जप करण्यात आला. वारकरी साप्रदयातील एक जेष्ठ किर्तनकार … Read more

हभप बंडातात्या कराडकर यांना झटका; तातडीने पुण्याला हलविले

BandatatyaKaradkar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ किर्तनकार व प्रवचनकार युवक मित्र ह.भ.प. प्रकाश सदाशिव जंत्रे उर्फ बंडा तात्या कऱ्हाडकर यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आल्याने गुरुवार दि. 12 रोजी सकाळी 7 वाजता त्यांना येथील पुणे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते, उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर आहे, तथापि काही वैद्यकिय चाचण्या … Read more

बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सोडणार नाही मग तो सदावर्ते असो किंवा बंडातात्या : भगवान निंबाळकर

Gunaratna Sadavarte Satara News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके बेताल वक्तव्य केल्या प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. त्यांची आज 4 दिवसांची पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना दुपारच्या सत्रात कोर्टात हजर केले जाणार आहे. सदावर्ते यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणाचा तपास सातारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्याकडे आहे. आज निंबाळकर यांनी जिल्ह्यात बेताल … Read more

हभप बंडातात्या सातारा शहर पोलिस ठाण्यात आले आणि गेले

सातारा | सातारा येथे जमावबंदी आदेशाचा भंग करून दंडुका, दंडवत आंदोलन करणे व खा. सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे या महिला नेत्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले होते. याविषयी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशीसाठी ह. भ. प बंडातात्या कराडकर आज बुधवारी दि. 9 रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात हजर झाले. … Read more

बंडातात्या कराडकर यांच्यावर कडक कारवाई करण्याची युवक काँग्रेसची विश्रामबाग पोलीस निरीक्षकांकडे मागणी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भारती विद्यापीठाचे संस्थापक, राज्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉ.पतंगराव कदम यांच्या कुटूंबियाबद्दल बंडातात्या कराडकर यांनी बदनामीकारक वक्तव्य केले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने विश्रामबाग पोलिसांकडे करण्यात आली. नगरसेवक मयूर पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांना निवेदन दिले. … Read more

बंडातात्या कराडकरांची जामिनावर सुटका, पोलिसांकडून तब्बल अडीच तास चौकशी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यावर सातारा शहर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. त्यांना सकाळी ताब्यात घेत त्याची तब्बल अडीच तास चौकशी करण्यात आल्यानंतर त्यांची तात्पुरत्या स्वरूपात जामिनावर सुटका करण्यात आली आहे. जेष्ठ कीर्तनकार … Read more

बंडातात्या कराडकरांवर करणार बदनामीचा खटला दाखल ; बाळासाहेब पाटील यांचा इशारा

सातारा प्रतिनिधी। सकलेन मुलाणी ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी काल सातारा येथे करण्यात आलेल्या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह साताऱ्याचे पालकमंत्री तथा आमदार बाळासाहेब पाटील यांचे चिरंजीव जशराज पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी आता बंडातात्या कराडकर यांच्या वरती गुन्हा दाखल करून बदनामीचा खटला दाखल करणार असल्याचा … Read more

साताऱ्यात बंडातात्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधात सर्वपक्षीय महिला पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. याच्या निषेधार्थ आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अंदोलन केसात आले. त्याचे पडसाद सातारा येथेही उमटले. सातारा येथील पोवई नाका परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतर पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांच्यावतीने निषेध आंदोलन करण्यात आले. सातारा येथे … Read more

बंडातात्या कराडकरांवर अजून एक गुन्हा दाखल होणार?

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे. दरम्यान आज सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी बंडा तात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सातारा शहर पोलिसांत आल्या आहेत, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे … Read more

बंडातात्या कराडकर यांच्या ‘त्या’ वक्तव्याची विलासबाबा जवळ यांनी मागितली माफी

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. यावरून आज सातारा पोलीसांनी बंडातात्या कराडकर यांच्या फलटण तालुक्यातील पिंपरजमधील मठात जाऊन त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी व्यसनमुक्त युवक संघाचे विलासबाबा जवळ यांनी माफी मागितली आहे. बंडातात्या … Read more