Warmest Year : धोक्याची घंटा!! पृथ्वीवर आलंय भीषण संकट; WMO ने अहवालातून केला मोठा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Warmest Year) पृथ्वीवरील लोकसंख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. लोकसंख्येचा इतर घटकांवर होणारा परिणाम हा अत्यंत धोकादायक दिशेकडे होणारी वाटचाल दर्शवतो आहे. दरम्यान संयुक्त राष्ट्राचा अहवाल समोर येताच एक मोठी माहिती मिळाली आहे. ज्यानुसार २०२३ हे गेल्या १० वर्षातील सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचे समोर आले आहे. या वर्षाने जागतिक उष्णतेचे सर्व रेकॉर्ड मोडल्याने याचा महासागरावर अत्यंत गंभीर परिणाम झाला आहे. इतकेच नव्हे तर, हिमनद्यांच्या बर्फामुळे विक्रमी नुकसान झाल्याचे WMO च्या अहवालातून समोर आले आहे. अर्थात पृथ्वीचे भविष्य धोक्यात आहे.

पृथ्वीसाठी धोक्याची घंटा (Warmest Year)

WMO ने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालात असे समोर आले आहे की, २०२३ हे अत्यंत उष्ण वर्ष राहिले आहे. WMO ने सांगितल्यानुसार, २०२३ मध्ये जागतिक सरासरी पृष्ठभागाचे तापमान हे १८५० ते १९०० पूर्व औद्योगिक कालावधीच्या सरासरीहून एकूण १.४५ अंश सेल्सिअस इतके जास्त आहे. अर्थात २०१६ साली नोंद केलेल्या पूर्व औद्योगिक काळाच्या तुलनेत २०२३ मध्ये १.२९ अंश सेल्सिअस इतकी लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

हिमनद्यांचे विक्रमी नुकसान

(Warmest Year) जागतिक हवामान संघटना अर्थात WMO च्या अहवालात असे समोर आले आहे की, २०१४ ते २०२३ हा काळ सर्वात उष्ण दशक राहिला आहे. तशी या अहवालात नोंद करण्यात आली आहे. ज्याचा गेल्या १० वर्षातील हवामानावर विविध पद्धतीने गंभीर स्वरूपात परिणाम दिसून आला आहे. जसे की, महासागरावर उष्णतेच्या लाटांचा गंभीर परिणाम आणि हिमनद्यांचे विक्रमी नुकसान.

पृथ्वी नामशेष होणार…

WMO ने सादर केलेल्या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, २०२३ च्या रिपोर्टमध्ये २०१४ ते २०२३ ही सर्वाधिक उष्ण वर्षाचा कालावधी म्हणून नोंदविण्यात आले आहे. या अहवालाबाबत WMO चे सचिव आंद्रिया सेलेस्टे साऊलो म्हणाले की, ‘या अहवालाकडे जगाने रेड अलर्ट म्हणून बघायला हवे. कारण उष्णतेचे रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडले गेले आहेत. (Warmest Year) २०२३ मध्ये उष्णतेच्या सर्वाधिक लाटा वाढल्या. ज्याचा परिणाम विशेषत: महासागर आणि हिम नद्यांवर झाला. अंटार्क्टिक महासागरातील बर्फाचेदेखील नुकसान झाले. एकूणच, हे सर्व चिंतेचे कारण असल्याने याकडे गांभीर्याने पहायला हवे. एकंदरच ही परिस्थिती पाहता लक्षात येते की, पृथ्वी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे’.

शेवटची संधी

WMO संस्थेने पृथ्वीसाठी रेड अलर्ट असल्याचे सांगितल्यानंतर आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ज्यामध्ये संस्थेने सांगितलंय की, या काळात अक्षय्य ऊर्जा उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. २०२२ च्या तुलनेत सौर पवन आणि जलविद्युतद्वारे गतवर्षी अक्षय्य ऊर्जा क्षमतेत सुमारे ५० टक्क्यांनी वाढ झाल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पृथ्वीचे होणारे नुकसान टाळून पृथ्वीवरील दीर्घकालीन वाढणारे तापमान कमी ठेवण्यासाठी आणि हवामानातील सर्वात वाईट परिस्थिती टाळण्यासाठी जगाकडे एक शेवटची संधी आहे, असे म्हणायला हरकत नाही. (Warmest Year)