मुंबई । दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे (Warren Buffett) यांच्या इंडिकेटरच्या दृष्टीने देशाच्या इक्विटी मार्केटचे मूल्यांकन खूप जास्त आहे. या इंडिकेटरमध्ये, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट (GDP) रेशो मार्केट कॅपिटलायझेशनची तुलना करण्यासाठी वापरले जाते. हे प्रमाण अनेक वर्षांच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. बफे म्हणाले की,” मूल्यांकनाची पातळी जाणून घेण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.”
ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल सिक्युरिटीज लिमिटेडने सांगितले की,” ते सध्या 104 टक्के आहे, जे सरासरी 79 टक्के पेक्षा जास्त आहे.” तर विश्लेषकांचे म्हणणे आहे की,” हे देशातील शेअर्सचे उच्च मूल्यांकनाचे संकेत देत आहे. मात्र, येत्या काही महिन्यांत अर्थव्यवस्थेत रिकव्हरीचा समावेश होण्याची शक्यता आहे.”
शेअर बाजारात उच्च वाढ
देशाची जीडीपी ग्रोथ सुधारत आहे, पण शेअर बाजारात झपाट्याने वाढ झाल्यामुळे हे प्रमाण वाढीव पातळीवर राहू शकते. विश्लेषकांनी सांगितले की,” कॉर्पोरेट निकालांच्या रिकव्हरीला होणारा उशीर आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता ही शेअर बाजारातील चढ -उताराला प्रतिबंध करण्याचे कारण बनू शकते.”
शेअर बाजारातील मूल्ये उच्च पातळीवरून थोडीशी कमी झाली आहेत परंतु अजूनही बहुतेक एमर्जिंग मार्केट्सपेक्षा जास्त आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या मदत पॅकेजमध्ये झालेली घट, डॉलरची मजबुती, अलीकडे काही IPO ची कमकुवत लिस्टिंग यामुळे गुंतवणूकदारांचा शेअर बाजारातील रस काहीसा कमी होऊ शकतो.
IPO मार्केटमध्ये विक्रमी वाढ
या वर्षी विक्रमी संख्येने IPO येत आहेत. यासोबतच विक्रमी फंडही गोळा केला जात आहे. एका अंदाजानुसार, कंपन्या यावर्षी IPO च्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांहून अधिकचा फंड उभा करतील. या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत आतापर्यंत सुमारे 40 IPO लिस्ट करण्यात आले आहेत.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) च्या ब्रोकिंग आणि वितरण व्यवसायानुसार, 5.7 लाख गुंतवणूकदार ग्राहकांनी फक्त पहिल्या चार महिन्यांत IPO चे सब्सक्राइब केले आहे, जे मागील पूर्ण वर्षातील 5.1 लाख होते. MOFSL ने पुढे म्हटले आहे की,” गुंतवणूकदारांनी गुंतवणूकीत अनेक पटीने वाढ 17 IPO मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर आधारित आहे. गेल्या आर्थिक वर्षात अशा IPO ची संख्या 36 होती. एकूण IPO ग्राहकांपैकी सुमारे दोन तृतीयांश ग्राहक प्रामुख्याने गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील आहेत.”