माजी कसोटीपटू वसीम जाफर पुढच्या 2 वर्षांसाठी ‘या’ संघाचा होणार मुख्य प्रशिक्षक!

wasim zafar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी कसोटीपटू सलामीवीर वसीम जाफर आपल्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याच्यावर आता मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. तो आता नव्या रोलमध्ये दिसणार आहे. देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांत ओडिशा संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी ओडिशा क्रिकेट असोसिएशनने वसीम जाफरकडे दिली आहे.

जाफरसोबत 2 वर्षांचे कॉन्ट्रॅक्ट
पुढच्या 2 वर्षांसाठी ओडिशा क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक वसीम जाफर असणार आहे. ओडिशा क्रिकेट असोसिएशनने त्याच्याबरोबर 2 वर्षांसाठी कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे. ओडिशा क्रिकेट सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. वसीम जाफर रश्मि रंजन परीदा यांची जागा घेणार आहे. जे दोन सिझन संघासोबत होते, अशी माहिती ओडिशा क्रिकेट असोसिएनचे सीईओ सुब्रत बहेडा यांनी दिली आहे.

मागच्या वर्षी उत्तरखंडचा कोच
सर्व वयोगटातील क्रिकेट विकासाव्यतिरिक्त जाफर राज्यातील प्रशिक्षक विकास कार्यक्रमातही सहभागी होणार आहे, अशी माहिती सुब्रत बहेडा यांच्याकडून देण्यात आली आहे. मार्च २०२० मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांने उत्तराखंड संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळली होती पण असोसिएशनशी झालेल्या वादानंतर त्याने राजीनामा दिला होता.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधला लिजेंड
प्रथम श्रेणी क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा माजी सलामीवीर अशी वसीम जाफरची ओळख आहे. वसीम जाफरने आतापर्यंत 260 प्रथम श्रेणी मॅचेस खेळल्या आहेत.यामध्ये त्याने 19410 रन्स केले आहेत. यामध्ये 314 हा त्याचा सर्वाधिक स्कोर आहे. त्याने यामध्ये 50.7 च्या सरासरीने 57 शतके आणि 91 अर्धशतके झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमधला तो लिजेंड मानला जातो. वसीम जाफरने भारताकडून 31 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 1944 धावा केल्या आहेत. तसेच दोन वन डे सामन्यातही जाफर भारताकडून खेळला आहे. वासिम जाफरने 2000 मध्ये आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून कसोटीत पदार्पण केले होते. तर तो आपली शेवटची कसोटी 2008 मध्ये खेळला होता.

दहा रणजी फायनल खेळाला, सर्व सामने जिंकले
2019 साली विदर्भ संघाने रणजी चषक जिंकला होता. त्यावेळी वासिम जाफर विदर्भकडून खेळला होता. नागपुरात विदर्भ संघाने जिंकलेली ही रणजी ट्रॉफी वसिम जाफरच्या कारकीर्दीतली दहावी ट्रॉफी ठरली आहे. 42 वर्षीय वसिम जाफरचा हा दहावा रणजी अंतिम सामना होता आणि या सर्व सामन्यांमध्ये त्याला विजयाचा साक्षीदार होता आले होते. त्याने 2015-16 पर्यंत मुंबईकडून खेळताना आठ वेळा रणजी चॅम्पियन होण्याचा मान मिळवला होता.वसिम जाफरने या विक्रमासोबत सर्वाधिक वेळा चॅम्पियन होण्याचा मनोहर हर्दिकर आणि दिलीप सरदेसाई यांचा विक्रम मोडला आहे. या यादीत वसिम जाफरच्या पुढे अजित वाडेकर आणि अशोक मंकड यांचा नंबर लागतो. अजित वाडेकर यांनी 11 तर अशोक मंकड यांनी 12 वेळा चॅम्पियन होण्याचा मान पटकावला आहे.