Viral Video : ‘इथे’ आईस्क्रीम कोनमध्ये कॉफी प्यायला मोजले जातात ‘इतके’ रुपये; असं कॉम्बिनेशन कधी ट्राय केलंय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) आजपर्यंत तुम्ही अनेक रेस्टोरंटमध्ये, हॉटेलमध्ये तसेच कॅफेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी प्यायला असाल. त्यातल्या त्यात तरुणांसाठी कोल्ड कॉफी म्हणजे जीवचं. त्यामुळे अनेक चहा- कॉफी विक्रेते ग्राहकांचे लक्ष ओढण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत असतात. कधी सगळ्यांपेक्षा अलग प्रकारे कॉफी सर्व्ह करतात. तर कधी हटके डिझाइन्स असलेल्या कपांचा वापर करतात. या अजब दुनियेत एक गजब कॉफी विक्रेता आहे. ज्याच्याकडे कॉफी प्यायची असेल तर कप मिळत नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, मग कॉफी प्यायची कशी? तर याचं उत्तर आहे आईस्क्रीम कोन.

आजपर्यंत तुम्ही स्वतः कधी आईस्क्रीम कोनमध्ये कॉफी प्यायला आहात का? नाही? तर मग हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून तुम्हालाही एक कप नव्हे तर एक कोन कॉफी पिण्याची इच्छा नक्कीच होईल. हा सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ चेन्नईतील आहे. (Viral Video) ज्यामध्ये सुरवातीला आपण पाहू शकतो की, एका स्टँडवर आईस्क्रीम कोन ठेवलेला आहे. यानंतर दुकानातील एक कर्मचारी जगमध्ये भरून ठेवलेली तयार कॉफी या आईस्क्रीम कोनमध्ये ओतताना दिसतो. त्यानंतर हा कॉफीने भरलेला आईस्क्रीम कोन स्टँडमधून काढून ग्राहकांना दिला जातो आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by MADRAS FOOD JOURNAL™ BY ANU MURUGAN🧿 (@madrasfoodjournal)

आजपर्यंत कुणीच आईस्क्रीम कोनमध्ये आईस्क्रीमऐवजी कॉफी विकली नसेल. पण या कॉफी विक्रेत्याने ध्यानी मनी देखील येणार नाही अशी गोष्ट करून दाखवली आहे. (Viral Video) हे आईस्क्रीम कोन आणि कॉफीचे वेगळे फूड कॉम्बिनेशन पाहून अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडीओतील कॉफी पिण्याची ही वेगळी पद्धत पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. चेन्नईतील ही आगळी वेगळी कॉफी पिण्यासाठी ग्राहकांना एकूण २५० रुपये मोजावे लागतात.

(Viral Video)सोशल मीडियावर व्हायरल होणार हा व्हिडीओ madrasfoodjournal नावाच्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून शेअर करण्यात आला आहे. या युजरचे नाव अनु मुरुगन असे आहे. हा युजर एक फूड ब्लॉगर असून त्याच्या प्रोफाइलवर असे अनेक विविध प्रकारचे व्हिडीओ पहायला मिळत आहेत. सध्या तरी त्याने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही कॉफी प्रेमींनी या अनोख्या कॉफीला पसंती दर्शवली आहे. तर काहींनी मात्र कमेंट्सच्या माध्यमातून नाराजी दर्शवली आहे.