डिसेंबरच्या अखेरीस वाढेल पाण्याची क्षमता-महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | औरंगाबाद शहरातील काही भागात कधी पाचव्या तर कधी नवव्या-दहाव्या दिवसांनी पाणीपुरवठा होतो. याबाबत महानगरपालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांच्याकडून आढावा घेण्यात आला.

सध्या शहराला जायकवाडी धरणातून 120 -125 एमएलडी पाणी मिळत आहे. त्याचबरोबर महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याची क्षमता 15 ते 20 एमएलडी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाण्याची तपासणी केली असून डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची क्षमता वाढेल अशी आशा करतो, असे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडे म्हणाले आहेत.

शहराला कमी पाणीपुरवठा होत असल्यामुळे धरणातून पाण्याची क्षमता वाढवण्यासाठी महापालिकेकडून तयारी सुरू आहे. त्याचबरोबर पालक मंत्री सुभाष देसाई यांनी संस्थेला पाण्याच्या समान वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत दुसरी बैठक लवकरच संबंधित अधिकारी, जल तज्ञ आणि इतरांच्या उपस्थितीत आयोजित केली जाणार आहे. त्यांच्या सूचना व मते जाणून घेतल्यानंतर महापालिका पुढील कारवाई करेल असे सांगण्यात आले.

Leave a Comment