Water Supply Charges | आजकाल आणि शेतकरी तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहे. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करणे खूप सोपे झालेले आहे. परंतु तेवढेच आव्हानात्मक देखील झालेले आहे. कारण नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आणि बाजार भाव कमी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. अशातच आता शेतकऱ्यांसाठी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या माध्यमातून शेतीसाठी जे पाणी आहे. त्या पाण्याच्या पाणीपट्टीच्या दरात तब्बल 10 पटींनी वाढ केलेली आहे.
आता शेतकऱ्यांचा आर्थिक भार आणखीनच वाढणार आहे. कारण शेतकऱ्यांना जास्त पाणीपट्टी भरावी लागणार आहे. सततच्या होणाऱ्या आर्थिक नुकसाना बरोबर आता शेतकऱ्यांना हा एक मोठा आणखी मोठा फटका बसत आहे. जलसंपदा विभागाने ही दरवाढ 9Water Supply Charges) केलेली आहे. त्यामध्ये बागायती शेतकऱ्यांसाठी एका वर्षाला एकरी 5443 रुपये इतका दर भरावा लागणार आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागाने शेतीसाठी लागणाऱ्या पाणीपट्टीच्या दरामध्ये दहा पटीने वाढ केलेली आहे. त्यामुळे बागायती शेतकऱ्यांना त्यांच्या एक एकर शेतीसाठी दरवर्षी 5443 रुपये एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे. तर खरीपच्या शेतकऱ्यांना 1890 रुपये एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे, तर रब्बी हंगामासाठी 3780 रुपये एवढी पाणीपट्टी भरावी लागणार आहे.
परंतु दहा पटीने जास्त दरवाढ झाल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. दर तीन वर्षांनी कृषी सिंचन आणि आर्थिक उद्योगाचे पुनर्लोकन आणि सुधारणा देखील केल्या जातात. याआधी 11 जानेवारी 2018 रोजी सुधारणा केली होती. त्यानंतर 1 जुलै 2019 ते 30 जून 2022 या कालावधीत कोणत्याही प्रकारचे दर निश्चित केले नव्हते.
गेल्या दोन वर्षांपूर्वी कोरोना कालावधीमध्ये आर्थिक संकटामुळे पाणीपट्टीच्या बाबत सरकारने कोणताही निर्णय घेतला नव्हता. परंतु आता पुन्हा एकदा हे दर निश्चिती करण्यात आलेले आहे. आणि एकदम दहा पटीने ही दरवाढ केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.