Watermelon Side Effects : तुम्ही रोजच कलिंगड खाताय? थांबा, अगोदर हे वाचा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Watermelon Side Effects आंबा आणि कलिंगडं ही फळे आवडत नाहीत अशा व्यक्ती कवचितच आढळून येतील. ही फळे बहुदा उन्हाळ्यातच येतात. उन्हाळ्यात सहसा जेवण कमी जाते त्यामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी या दिवसांत बऱ्याचदा कलिंगड खाल्ले जाते. कलिंगडामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. हे सहसा उन्हामुळे येणारा थकवा दूर करण्यास मदत करते. कलिंगड हे Cucurbitaceae प्रवर्गातील फळ आहे. याच प्रकारात काकडीचे नाव देखील येते. या प्रकारातील फळे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात.

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जवळपास 91% असते. त्यामुळे बहुतेकदा उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ते फायदेशीर ठरते. जी लोकं कमी पाणी पितात त्यांच्यासाठी कलिंगड हे उन्हाळ्यात वरदान ठरू शकते. कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 असतो त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी जास्त प्रमाणात कलिंगड खाऊ नये. (Watermelon Side Effects)

डायटिंग करणाऱ्या लोकांसाठी कलिंगड खूप फायदेशीर

एका हेल्थ रिपोर्ट्सनुसार, कलिंगडामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूपच कमी असल्याचे सांगितले जाते. तसेच डायटिंग करणाऱ्या लोकांसाठी देखील कलिंगड खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध होते. याव्यतिरिक्त, कलिंगडामध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन बी 5 आणि व्हिटॅमिन ए सारखे व्हिटॅमिन देखील असतात. कलिंगडामध्ये प्लांट कंपाउंड साइट्रलाइन आणि लाइकोपीन देखिल सापडतात. कलिंगडामध्ये जो लाल गर असतो त्यामध्ये साइट्रलाइन आढळते जे शरीराला आवश्यक असणारे अमीनो ऍसिड आर्जिनिनमध्ये रूपांतरित करते. हे आर्जिनिन फुफ्फुस, किडनी, यकृत आणि वंध्यत्वासाठी खूपच फायदेशीर असते .

वजन कमी करण्यासाठी कॅलरी आणि फायबर खूप महत्वाचे असतात. कलिंगडाच्या 100 ग्रॅम गरामध्ये 90% पेक्षा जास्त पाणी असते. त्यात फायबरचे प्रमाणही कमीच असते, 100 ग्रॅम कलिंगडाच्या गरामध्ये फक्त 0.4 ग्रॅम फायबर असते. याशिवाय त्यात 30 कॅलरीज असतात. यामध्ये असलेले साइट्रलाइन शरीरात असलेली अतिरिक्त चरबी जाळून टाकण्यास मदत करते. तसेच कलिंगडामध्ये असलेले लाइकोपीन हे अँटीऑक्सिडंट कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. (Watermelon Side Effects).

कलिंगडाच्या अतिसेवनाने हे आजार उध्दभवू शकतात

मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल ती अशी कि, कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 आहे. ग्लायसेमिक इंडेक्स हा तुमच्या शरीरात किती ग्लुकोज गेला आहे हे दर्शविते. म्हणजेच जर एखाद्याला 30 ग्रॅम ग्लुकोज दिले गेले आणि त्यानंतर त्याच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासली, तर त्याने जे खाल्ले आहे त्याचा भाग आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण, खाल्लेल्या अन्नाचे ग्लायसेमिक मल्टी प्लाय (गुणाकार) करून जे मोजले जाते ते म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. (Watermelon Side Effects)

याद्वारे आपल्या कळून येईल की, या ग्लायसेमिक इंडेक्सचा आपल्या आरोग्यावर किती परिणाम होऊ शकतो. त्याच वेळी, कोणतीही गोष्ट जास्त खाल्ली गेली तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतील. अशा परिस्थितीत जास्त कलिंगड न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे यकृतामध्ये जळजळ, ग्लुकोजचे प्रमाण वाढणे, पचनाच्या समस्या आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही होऊ शकेल.

हे पण वाचा –

Facebook देतंय 50 लाखांचं कर्ज; कसा करायचा अर्ज? व्याजदर काय? जाणुन घ्या

बाथरूमच्या नळामध्ये वीजप्रवाह उतरल्याने अंघोळ करताना तरुणाचा मृत्यू

फटाक्यांनी गच्च भरलेल्या चालत्या ट्रकवर पडली वीज; पुणे – सोलापूर मार्गावर त्यानंतर झालं असं काही…(Video)

Leave a Comment