सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील काही भागात आज गारांचा तुफान पाऊस झाला. कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन परिसरात अचानक झालेल्या पावसामुळे रस्त्यांवर गारांचा थर साचलेला होता. अचानक झालेल्या गारांसह पावसामुळे वाठार स्टेशन काश्मीर प्रमाणे बर्फाच्छादित वातावरण पहायला मिळत होते.
उत्तर कोरेगांवमधील वाठार स्टेशन गावात झालेल्या पावसामुळे व्यापारी, शेतकरी व नागरिकांची चांगलीच पळापळ झाली. दुष्काळी भागात पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात आनंदी वातावरण पहायला मिळाले. मात्र गारांच्या तुफान पावसाने रस्त्यांवर बर्फ अथंरल्याने लोकांनी काहीकाळ त्यांचा आनंद घेतला. मात्र शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/843409372918476
वाठार स्टेशन परिसरात झालेल्या पावसाने काश्मीरमध्ये आहोत की सातारा जिल्ह्यात असा प्रश्न पडत होता. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः गारा साठून राहिल्या होत्या. त्यामुळे गारांचा पंधरा शुभ्र गालिचा पसरल्याचा भास होत होता.
खटाव तालुतील वडूज परिसरातही गारांचा मोठा पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा