‘त्या’ गोष्टीमुळं पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंचावर ममता बॅनर्जींनी सुनावले खडे बोल, म्हणाल्या..

कोलकाता । नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त कोलकात्यातील ‘पराक्रम दिवस’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. केंद्रीय सांस्कृतीक मंत्रालयाने कोलकात्यात या कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.

यावेळी ममता बॅनर्जी भाषणाला उभ्या राहिल्या तेव्हा व्यासपीठाच्या खालून ‘जय श्री राम’ अशा घोषणा सुरु झाल्या होत्या. भाषणावेळी घातलेल्या गोंधळामुळे ममता बॅनर्जी नाराज झाल्या आणि त्यांनी खडे बोल सुनावत भाषणास नकार दिला.

ममता बॅनर्जीं म्हणाल्या की, “मला वाटते की सरकारने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाची एक प्रतिष्ठा राखण्याची आवश्यकता आहे. हा कोणताही राजकीय कार्यक्रम नाही. इथे कोणाला बोलावून त्याचा अपमान करणे हे शोभत नाही. विरोधाच्या रुपात मी काहीच बोलणार नाही.” मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like