नवी दिल्ली वृत्तसंस्था | भारतीय वायुसेनेचे हेलिकॉप्टर आज सकाळी जम्मू-काश्मीर येथील बडगाम येथे कोसळले होते. मात्र यानंतर आम्ही हे लढाऊ चॉपर पडले असल्याची बोंब पाकिस्तानने करण्यास सुरवात केली होती. पाकिस्तानी न्युज चॅनेल ने देखील ही बातमी दाखवायला सुरु केले होते.
मात्र काही तासातच पाकिस्तानने बडगाम दुर्घटनेचे चॉपर आम्ही पडले नाही अशी कबुली दिली.पाकिस्तानचे लष्कर प्रवक्ते मलिक गफूर यांनी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारतावर बॉंम्ब हल्ला केल्याचा दावा केला आहे.आमच्या सेनेत दम आहे हे आम्हाला भारताला दाखून द्यायचे आहे म्हणून हा हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले.पाकिस्तानी विमानांनी भारताच्या सहा ठिकाणांना लक्ष केलं होत. पाकिस्तानची ताकद आम्हाला दाखवायची होती, आम्ही बॉंम्ब हल्ला करून काहीही करू शकतो असे विनोदी वक्तव्य गफूर यांनी केले.
भारतीय वायुसेनेच्या हॅलिकॉप्टरला जम्मू- काश्मीरच्या बडगाम येथे कोसळले आहे. या अपघात दोन अधिकारी वैमानिक आणि सह वैमानिक शाहिद झाले आहेत. हॅलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे समजते आहे.
इतर महत्वाचे –
भारतीय वायुसेनेच्या हेलिकॉप्टरला अपघात … दोन जवान शाहिद