नयनतारा सहगल यांना माझा विरोध नाही – राज ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटणासाठी बोलावण्यात आले होते मात्र, ऐनवेळी काही संघटनांनी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिका-याने त्यांच्या निमंत्रणावर आक्षेप घेत साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सेहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आलं आहे. नयनतारा सहगल या इंग्रजीमध्ये लेखन करणाऱ्या लेखिका आहेत.

दरम्यान, वाढत्या विरोधानंतर ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी रद्द केल्यानंतर, आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाची अधिकृत भूमिका मांडली आहे. राज ठाकरे यांनी ट्विटरवर पक्षाची अधिकृत भूमिका असलेलं पत्र पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. “माझ्या पक्षातील एका सहकाऱ्याने नयनतारा सहगल यांना विरोध केला तरी मनसेचा अध्यक्ष या नात्याने माझा अजिबात विरोध नाही. शिवाय माझ्या सहकाऱ्यांच्या भूमिकेमुळे संमेलनाच्या आयोजकांना जो मनस्ताप झाला त्याबद्दल मी एक मराठी भाषाप्रेमी दिलगिरी व्यक्त करतो,” असंही राज ठाकरे म्हणाले.

“नयनतारा सहगल यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल, तसंच ही परंपरा जगासमोर नेण्याच्या प्रक्रियेतील त्या एक वाहक होणार असतील तर मला किंवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचं कारण नाही. पक्षाचे नेते-प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी हीच भूमिका स्पष्ट शब्दात मांडली होती. नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नाही, त्यांनी जरुर यावं, आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो,” असं राज ठाकरे यांनी या पत्रात लिहिलं आहे. तसंच मनसैनिकांनी यापुढे अशा संवेदनशील विषयांवर भूमिका व्यक्त करताना माझ्याशी चर्चा केल्याशिवाय भूमिका मांडू नये, असा दमही त्यांनी भरला आहे.

दिवसभराच्या ताज्या घडामोडी आणि हटके लेख घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

आणि राज ठाकरेंच्या गाड्यांचा ताफा ढाब्यावर थांबला…

जनतेचा नरेंन्द्र मोदींवरचा विश्वास उडाला आहे – राज ठाकरे

इथून लढवू शकतात रोहित पवार विधानसभा निवडणूक

Leave a Comment