कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
सामनाची छायाचित्र काढणं हा नुसता छंद नाही तर ती हिम्मत आहे. एकनाथ शिंदे ही हिम्मत कुठून आणणार असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता, त्यावर शंभूराज देसाई यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. तेव्हा श्री. देसाई म्हणाले, आमच्यातील हिंमत आम्ही सहा महिन्यापूर्वी राऊतांना दाखवली आहे. महाराष्ट्रांने पाहिली ज्या नेत्याच्या मागे 50 आमदार आणि 13 खासदार असतात तो जिगरबाजाच असतो, म्हणूनच त्याच्या पाठीशी आमदार- खासदार असतात. संजय राऊतांनी पोकळ गप्पा मारु नये, पोकळ बोलू नये. सहा महिन्यापूर्वी शिंदे साहेबांनी त्यांची हिंमत देशाला दाखवुन दिली आहे, असे सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले.
दाैलतनगर- मरळी (ता. पाटण) येथे ते बोलत होते. मराठा चेहरा शिवसेनेतून बाहेर जात असल्याने मी गद्दारी केल्याचे गुलाबराव पाटील यांनी केलेल्या विधानावर शंभूराज देसाई यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला माहिती नाही, गुलाबराव पाटील काय बोलले. मी माहिती घेवून बोलतो.
शंभूराज देसाई यांच्याकडून ठाकरे, राऊत व केजरीवालांचा समाचार pic.twitter.com/UnZqgRjpyh
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) February 25, 2023
एकाच पक्षाचे दोन मुख्यमंत्री म्हणजे देश नव्हे
यावेळी देशभरातील नेते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. आमची 2024 च्या निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. असे आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली त्यावर शंभूराज देसाई म्हणाले, एकाच पक्षाचे दोन मुख्यमंत्री म्हणजे देश नव्हे, देश मोदी साहेबांच्या पाठिशी आहे, हे उध्दव ठाकरे यांनी समजून घेतले पाहिजे, असा पलटवार शंभूराज देसाई यांनी संजय राऊत यांचे विधानवर केला.