कर्नाटकातून जतला कृष्णेचे पाणी देणार; अमित शहा यांची ग्वाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी। ‘काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने १५ वर्षात महाराष्ट्राला रसातळाला नेले मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने सहकार, उद्योग, अर्थ, कृषि, सिंचन, दुग्धव्यवसाय यासारख्या अनेक बाबींमध्ये महाराष्ट्राला वरच्या क्रमांकावर पुन्हा स्थान प्राप्त करुन दिले. सांगली जिल्ह्यातील ११ लाख शेतकऱ्यांची ३७०० कोटी रुपयांची कर्जमाफी शासनाने केली. म्हैसाळ, टेंभू योजनेसाठी भरीव निधी दिल्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा कायापालट झाला. जतला आता तुबची बबलेश्वर योजनेच्या माध्यमातून कर्नाटक शासनाकडून पाणी देण्यात येेईल, यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुराप्पा व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाली आहे, पाणी निश्चित मिळेल,’ अशी ग्वाही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी जत येथे बोलताना दिली.

भाजपचे उमेदवार आ.विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते. या सभेच्या निमित्ताने भाजपने जोरदार शक्तीप्रदर्शन केले. निवडणुकीतील अमित शहा यांची ही पहिलीच सभा होती. अमित शहा पुढे म्हणाले, कॉंग्रेसवाल्यांनी सहकार संस्था मोडीत काढल्या, सिंचन योजनांत भ्रष्टाचार केला, शेतकऱ्यांना देशोधडीला लावले, मात्र गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र पुन्हा विकासाच्या वाटेवर आणून ठेवला असून राज्याला प्रगतीपथावर आणण्यासाठी पुन्हा भाजप-सेना युतीला सत्तेवर आणा. असे आवाहन शहा यांनी जत येथे प्रचार सभेत बोलताना केले.

दरम्यान, सांगली जिल्ह्याला शासनाने मोठी मदत केल्याचा दावा अमित शहा यांनी केला. जिल्ह्यातील ११ लाख शेतकऱ्यांना ३७०० कोटी रुपयांची कर्जमाफी तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर सहा हजार रुपये, जिल्ह्यात १ लाख १७ हजार शौचालये, ४६ हजार उज्वल गॅस, ३८ हजार घरांमध्ये मोफत वीज, सांगली-पुणे रेल्वेचे दुहेरीकरण, कवठेमहांकाळ येथे ४०० कोटींच्या ड्रायपोर्टला मंजुरी तसेच ऊस उत्पादकांना त्यांच्या खात्यावर थेट अनुदान तर द्राक्ष निर्यातीला प्रोत्साहन दिल्याची माहिती या सभेत शहा यांनी दिली.

इतर काही बातम्या-

 

 

 

Leave a Comment