हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | चिपी विमानतळाच्या उद्घाटनावरुन आणि श्रेयवादावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना आमनेसामने आले आहेत. विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आलेच पाहिजे असं काही नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. पण, आता त्या विधानानंतर राणेंनी सूर बदलला असून आता मुख्यमंत्री आले तर त्यांचं स्वागतच करू अस म्हंटल आहे.
येत्या ९ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले तर त्यांचं स्वागतच करु, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. यापूर्वी उद्घाटन समारंभाला मुख्यमंत्री उपस्थित असावेत असे काही नाही, असे राणे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीका झाल्यानंतर आता नारायण राणे यांचे सूर बदलले असल्याचं म्हटले जात आहे.
दरम्यान, विकासाची प्रत्येक गोष्ट माझं स्वप्न आहे. सिंधुदुर्गात विमानतळ मी स्वत: मंत्री असताना बांधून पूर्ण केलं. आता हे विमानतळ 9 ऑक्टोबरला सुरू होत आहे, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. माझं श्रेय लाटण्याचा जे कोण प्रयत्न करत आहे, त्यांचं सिंधुदुर्गाच्या विकासात एक टक्क्याचं योगदान नाही, असंही ते म्हणाले.