…जर आदेश मिळाला तर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ- लष्करप्रमुख नरवणे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र। ‘भारतीय संसदीय ठरावानुसार संपूर्ण जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे.संसदेला जर पाकव्याप्त काश्मीर हवं असेल तर ,आम्हाला त्याबाबत आदेश मिळाल्यास आम्ही योग्य ती कारवाई करू” असं विधान भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेत माध्यमांशी संवाद साधतांना केलं. पाकव्याप्त काश्मीरबाबत विचारलेल्या एका प्रश्नाबाबत त्यांनी हे उत्तर दिलं.

यावेळी तिन्ही सैन्य दलात समन्वय असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, आमचे जवान आमची सर्वात मोठी ताकद आहे, भविष्यातील प्रत्येक आव्हानास सामोरे जाण्यास आम्ही सज्ज असल्याचेही नरवणे यांनी यावेळी सांगितले आहे.

आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहोत व भविष्यासाठी प्रशिक्षणावर देखील भर असणार आहे. सैन्य दलात देखील समन्वयावर का होत असल्याचेही त्यांनी यावेळी बोलून दाखवले.