हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| देशामध्ये कोरोनाचे संकट पुन्हा वाढत चाललेले दिसत आहे. कारण सिंगापूर अमेरिका आणि चीन सह इतर देशांमध्ये कोरोना रुग्णांचे दिवसेंदिवस वाढ होत असताना एक नवा व्हेरियंट जेएन-१ आढळून आला आहे. केरळमध्ये देखील या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारने नागरिकांना मास वापरण्याचा सल्ला दिला आहे.
येत्या 20 डिसेंबर रोजी सर्व राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांची बैठक केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी बोलवली आहे. या बैठकीमध्ये कोरोनाच्या या नव्या विषयांवर मात कसा करायचा तसेच आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने राबवली जावी यावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच या बैठकीच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री मांडविया श्वसनासंबंधी आजारांमुळे वाढत्या रुग्णसंख्येचा आढावा देखील घेणार आहेत. या बैठकीमध्ये सर्व राज्यांचे आरोग्य मंत्री सहभागी होणार आहेत.
दरम्यान, केरळमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. त्याचबरोबर 1 ते 17 डिसेंबर काळात दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे . केरळमध्ये नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. सध्या याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा या नव्या व्हेरियंटवर मात करण्यासाठी दिवस रात्र काम करत आहे.