Weather Update | राज्यातील हवामानात होणार मोठा बदल; पुढील 15 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | जुलै महिनामध्ये जोरदार पाऊस बरसल्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. पावसाचा जोर सगळीकडेच कमी झालेला आहे. आणि अगदी ऊन पडताना देखील दिसत आहे. परंतु आता हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा मोठा हवामान बदल होणार आहे. आणि मुसळधार पाऊस पडणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्टनंतर पुढील दहा-बारा दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. याबद्दलची माहिती हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी दिलेली आहे.

पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्ट पर्यंत राज्यात पाऊस विश्रांती घेणार आहे. परंतु त्यानंतर हवामानात मोठ्या बदल होऊन 19 ऑगस्टपासून मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्यातही चांगलाच पाऊस पडणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्रात वर्धा, नागपूर, अकोट, परतवाडा, बुलढाणा, अकोला, अमरावती, जळगाव, नंदुरबार, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, रत्नागिरी, धुळे, ठाणे या ठिकाणी 17 ऑगस्ट पर्यंत तुरळक पाऊस पडेल. परंतु त्यानंतर पावसाचा जोर वाढणार आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देखील पावसाने राज्यात चांगलाच घातलेला होता. परंतु त्यानंतर पावसाने विश्रांती घेतलेली आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता केरळ, ओडिसा आणि हिमाचल प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये देखील पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आलेला आहे. 21 ऑगस्ट पर्यंत दिल्ली आणि एनसीआर पर्यंत वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे 20 ऑगस्ट या दरम्यान अलर्ट देखील जारी केलेला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आग्नेय अरबी समुद्र आणि दक्षिण केरळ किनारपट्टीवरील राज्यात 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्यामुळे या काळात मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा मासेमारांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे 17 ऑगस्टपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाणे टाळावे असा इशारा देखील देण्यात आलेला आहे.