Weather Update | मे महिना चालू असला तरी गेल्या दोन दिवसापासून राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, मुंबई, डोंबिवली या परिसरात तर सोमवारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गेल्या दोन दिवसात पडणारा पाऊस हा वळीवाचा पाऊस होता. परंतु आता मान्सूनचा (Weather Update) पाऊस कधी येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आता यातच हवामान खात्याने एक मोठा अंदाज जाहीर केलेला आहे.
तो म्हणजे आता नैऋत्य मोसमी वारे 19 मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार निकोबारच्या बेटांच्या परिसरात दाखल होणार असल्याचे सांगितलेले आहे. त्यानंतर नैऋत्य वारे हे भारतातील प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या केरळमध्ये येणार आहेत. परंतु केरळमधील आगमनाची तारीख देखील अजून जाहीर केलेली नाही. परंतु सध्या वातावरण पाहता गेल्यावर यावर्षी लवकरच मान्सून नेण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
मान्सून कधी येणार? | Weather Update
मान्सूनचा पाऊस हा शक्यतो 21 मेच्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो. अंदमानमध्ये सुमारे 24 तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय होतात. परंतु यावर्षी आधीच अंदमानात हे वारे सक्रिय झालेले आहे. यामध्ये कोणताही अडथळा आला नाही, तर 1 जूनच्या आसपास हा मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. आणि महाराष्ट्रात 8 जूनच्या आसपास पाऊस यायला सुरुवात होईल. तर राज्यात मान्सून 16 जूनला दाखल होईल त्याचप्रमाणे कोकणात यावर्षी लवकर पाऊस दाखवण्याची शक्यता आहे.
एप्रिल महिन्यापासूनच राज्यात तापमान वाढलेले आहे. मुंबई आणि कोकणच्या परिसरातील तर जास्त प्रमाणात तापमान आहे. त्यामुळे पाऊस कधी येणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. आणि शेतकरी हे त्यांच्या पिकासाठी पावसाच्या पानावर अवलंबून असतात. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने पावसाळा हा ऋतू अत्यंत महत्त्वाचा असतो.
सोमवारी म्हणजे 13 मे 2024 रोजी मुंबई शहर, उपनगर ठाणे, या ठिकाणी वादळी वारे आणि जोरदार पाऊस पडला. त्यामुळे मुंबईच्या परिसरातील वाहतूक व्यवस्था कोडमडली होती. ठाण्यात सिग्नल नियंत्रण देखील बिघडले होते. मेट्रो सेवा देखील ठप्प झाली होती. त्यामुळे नागरिकांची खूप मोठी गैरसोय झालेली आहे.