Weather Update |राज्यात सध्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी मात्र कडाक्याचे ऊन पडलेले दिसत आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. तर काही ठिकाणी कडाक्याच्या उन्हामुळे लोकांना उष्माघाताचा देखील त्रास होत आहे. अशातच हाती आलेल्या माहितीनुसार आता पुढील चार दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी उष्णतेचा अलर्ट देखील देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस मुंबई, ठाणे, पालघरमध्ये पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रायगड आणि रत्नागिरीमध्ये ही पावसाची शक्यता पाहायला. (Weather Update)
या भागात पावसाची शक्यता | Weather Update
भारतीय हवामान विभागाने राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. आजपासून पुढील चार दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार 29 मे पासून ते 1 जूनपर्यंत विविध भागात पाऊस पडणार आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे आयएमडीच्या रिपोर्टनुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात देखील पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, उस्मानाबादमध्ये देखील पाऊस पडेल.
या भागात उष्णतेचा ऑरेंज आणि येल्लो अलर्ट | Weather Update
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आता धुळे, जळगाव, नाशिक या भागात कोरडे वातावरण असणार आहे. त्याचप्रमाणे पुणे, अहमदनगर आणि अकोला या भागामध्ये तापमानाचा पारा मात्र चांगला चढणार आहे. त्याचप्रमाणे 29 मे रोजी अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता दिलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्याला येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यालाही 29 आणि 30 मे साठी उष्णतेचा येलो जारी केलेला आहे.