Weather Update | पुढील 5 दिवस महत्वाचे ! कोकणासह ‘या’ शहरांना दिला पावसाचा येलो अलर्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | यावर्षी पावसाने वेळेआधीच आगमन केले होते. परंतु मध्यंतरी पुन्हा एकदा खंड पडल्यानंतर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून नव्याने सक्रिय झालेला आहे. जवळपास आठवडाभर पावसामध्ये खंड पडला होता. आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे. अरबी समुद्रात मोसमी वारे वाहू लागल्याने आता महाराष्ट्रात पावसासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील 48 तासात राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये पाऊस (Weather Update) बंद झाला होता.. त्यामुळे मुंबईतील नागरिकांना मेमधील उन्हासारखा चटका सहन करावा लागत होता. परंतु आता पुन्हा एकदा पावसाने मुंबईमध्ये हजेरी लावलेली आहे. मुंबई सह कोकणातील अनेक ठिकाणी जोरदार पाऊस आला आहे. तर पुढील काही दिवस कोकणात मुसळधार पावसाचा येलो हवामान विभागाने जारी केलेला आहे.

या ठिकाणी देण्यात आला येल्लो अलर्ट | Weather Update

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. त्याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या ठिकाणी देखील पावसाचा येल्लो अलर्ट जारी केलेला आहे. आणि विदर्भात देखील पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे.

विदर्भात पडणार मुसळधार पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार इथून पुढे पाच दिवस मराठवाड्यासह इतर ठिकाणी मुसळधार किंवा अति मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यातील जालना, नांदेड, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर तर विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल.