Weather Update | सप्टेंबर महिन्यात जवळपास अर्धा संपत आलेला आहे. या महिन्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला, तर काही ठिकाणी मात्र कडाक्याचे ऊन दिसलेले आहे. हवामान विभाग देखील पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी त्यांचा पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढचे पाच-सहा दिवस हवामान कोरडे असणार आहे. म्हणजेच पाऊस असणार नाही. या काळात पावसाने चांगलीच विश्रांती घेतलेली पाहायला मिळणार आहे. परंतु त्यानंतर महाराष्ट्रातून एकदा मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे.
पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 तारखेनंतर पुन्हा एकदा राज्यांमध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यानंतर हा पाऊस सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे. तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 2 ऑक्टोबर पर्यंत मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
म्हणजेच 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धो धो पाऊस पडणार आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये नांदेड, लातूर, परभणी, बीड, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, कोकण, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना देखील सांगण्यात आलेले आहे.
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास 11 दिवस हा पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहण्यास सांगितलेले आहे तसेच या काळात पिकांची काळजी घ्या. त्याचप्रमाणे तुमची उडीद आणि सोयाबीन यांसारखी पिके जर तयार झाली असेल, तर ती लवकरात लवकर काढून घ्या. कारण 21 तारखे नंतर राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
राज्यामध्ये 2 ऑक्टोबर पर्यंत चांगलाच पाऊस होणार आहे. त्यानंतर काहीसा आराम घेतल्यानंतर 21 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर नोव्हेंबर महिन्यापासून थंडीला सुरुवात होणार आहे. तसेच 5 नोव्हेंबर पासून राज्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल. असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिलेला आहे.