Weather Update | यावर्षी सरासरीपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात जास्त पाऊस पडलेला आहे. मागील काही दिवसापूर्वी पावसाने विश्रांती घेतली होती. परंतु महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस येत आहे. विदर्भात यावर्षी खूप जास्त पाऊस पडला. येथील जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. अशातच आता गणपतीच्या मुहूर्तावर पाऊस कोकणाच्या दिशेने वळलेला दिसत आहे. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे कोकण विभागातील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये वाऱ्यांच्या कमी दाबाच्या पट्ट्यांमध्ये रूपांतर झालेले आहे. त्यामुळे आता कोकणाच्या घाट माथ्यावर मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्यासाठी वातावरण तयार झालेले आहे. त्यामुळेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे.
याशिवाय सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड यांसारख्या ठिकाणी देखील पाऊस पडताना दिसत आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे. तसेच ठाणे, पालघर आणि मुंबईत देखील ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे गणपतीच्या दिवसांमध्ये महाराष्ट्रात चांगलाच पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
देशात सध्या अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक असे वातावरण दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार वारे तयार झालेले आहे. त्यामुळे संपूर्ण देशात पाऊस पडत असल्याचे सांगण्यात आलेले आहे. तसेच आंध्रप्रदेशपासून ओडिसापर्यंत देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. साधारण देशातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने सगळ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात दिलेला आहे.




