Weather Update | यंदा राज्यभरात जोरदार पाऊस पडलेला आहे. काही दिवसाचा विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावलेली आहे. गेल्या दोन चार दिवसापासून विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने अक्षरशः थैमान घातलेले आहे. या ठिकाणी पिकांचे नुकसान झालेले आहे. त्याचप्रमाणे अनेक जनावर देखील दगावली आहेत. परंतु या भागातील पाऊस सध्या काही प्रमाणात कमी झालेला दिसत आहे. परंतु आता येत्या काही दिवसात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या भागात माथ्यावर हाच पाऊस कोसळताना दिसणार आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आता पश्चिम महाराष्ट्रमध्ये पावसाचे (Weather Update ) संकट आलेले आहे.
गणेशउत्सव तोंडावर आलेला आहे. आणि कोकणातील परिसरात पावसाने त्याचा मोर्चा वळवल्यामुळे यावर्षी गणपतीमध्ये कोकणात कोसळ मुसळधार पाऊस (Weather Update ) कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काळामध्ये महाराष्ट्रात पावसाचा जोर थोडा फार कमी होणार आहे. परंतु सातारा, पुणे, पश्चिम महाराष्ट्र सह घाट माथ्यामध्ये जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक या भागांमध्ये देखील पाऊस येणार आहे. त्यामुळे या विभागांना हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
20 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा | Weather Update
भारतीय हवामान खाते नेहमीच पावसाचा अंदाज व्यक्त करत असतात. यावेळी देखील त्यांनी काही राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस असा अंदाज व्यक्त केलेला आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार येत्या काळातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, सिक्कीम, मध्यप्रदेश, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम, मेघालय, नागालँड, पश्चिम बंगाल, आसाम, उत्तराखंड, बिहार, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
हिमाचल प्रदेशाच्या काही भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी वादळी वारा देखील पाहायला मिळणार आहे. तसेच देशातील विविध भागांमध्ये सध्या पाऊस चालू आहे. आणि येत्या काळामध्ये देखील पाऊस असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आलेले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये अनेक ठिकाणी पाऊस दिसून येणार आहे. आणि त्यानंतर परतीचा पाऊस सुरू होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.