Weather Update | यावर्षी उन्हाचा तडाका मोठ्या प्रमाणात लागत आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ झालेली आहे. अशातच आता महाराष्ट्रात पुढील 48 तासांमध्ये तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे काही भागात वादळी वारा त्याचप्रमाणे जोरदार अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे पुढील दोन दिवसात राज्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता देखील आहे. तसेच काही ठिकाणी किमान तापमान स्थिर राहण्यासाठी अंदाज व्यक्त केला आहे. (Weather Update)
7 मेपासून अवकाळी पावसाची शक्यता (Weather Update)
पुढील 48 तासांमध्ये तापमानामध्ये वाढ होणार आहे. त्यानंतर हळूहळू तापमान कमी होणार असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने बदल होणार आहे. त्याचप्रमाणे सोलापूर, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्हात देखील पावसाची शक्यता आहे. तसेच पुढील 48 तासात मुंबई, पुणे यांचं राज्याच्या विविध भागांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे. 7 मे पासून मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस देखील पडणार आहे.
या ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नांदेड आणि लातूरमध्ये देखील अवकाळी पाऊस होणार आहे. भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणी देखील जारी केलेला आहे.
उष्माघाताच्या रुग्णांमध्ये ही वाढ
काही भागात तापमान कमी होऊन पाऊस जरी पडणार असेल, तरी काही भागात मात्र उन्हाचा पारा वाढल्यामुळे अनेक भागात उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे शक्यता निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन संपूर्ण नागरिकांना देण्यात आलेली आहे.