Weather Update | गणेशभक्तांचा आनंद होणार कमी; राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | यावर्षी संपूर्ण राज्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. सध्या सगळीकडे गणेश उत्सवाची धुमधाम दिसत आहे. तर दुसरीकडे पावसाने (Weather Update) देखील चांगलीच जोरदार बॅटिंग सुरू केलेली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आणि आज देखील या पावसाच्या शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभाग रोज पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत असतात. अशातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मुंबई देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता राज्यात कसे हवामाना असणार आहे. हे आपण जाणून घेऊया.

हवामान विभागाने आज कोकणामध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांना आज गेलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, गडचिरोली, परभणी, हिंगोली, बुलढाणा, जालना, अकोला, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या भागात वादळी वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे आज मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील या ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पावसामुळे गणेश भक्तांची चांगली तारांबळ उडणार आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण दिल्लीत देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. शहरातील अनेक भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे राजस्थान या राज्यात देखील आज पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे गणेशोत्सवाबद्दल नागरिकांच्या आनंदाला थोडीशी गालबोट लागण्याची शक्यता आहे. कारण शहरांमध्ये गणेशोत्सवात गणपती बघण्यासाठी खूप जास्त गर्दी असते. परंतु या पावसामुळे लोकांचा आनंद कमी होण्याची शक्यता आहे.