Weather Update | जुलै महिना सुरू झाला, तेव्हापासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. कोकणात तर अति मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक लोकांचे जनजीवन देखील विस्कळीत झालेले आहे. हवामान खाते देखील रोज हवामानाबद्दलचे आपले अंदाज व्यक्त करत असतात. अशातच आता हवामान विभागाने आज म्हणजेच 15 जुलै 2024 रोजी पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार (Weather Update) आजही कोकणासह मुंबई आणि इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणातील काही भागांना रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी | Weather Update
हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार आज रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे. कारण या भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रशासनाला देखील सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे या भागातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे देखील सांगण्यात आलेले आहे.
मुंबई पुण्यातही पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेले माहितीनुसार आज मुंबई, पुणे, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुंबईत गेल्या आठवड्यापासून सतत पाऊस पडताना दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी देखील साचले आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना देखील खूप त्रास होत आहे.
आज मुंबई कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाची (Weather Update) शक्यता आहे. आज कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये देखील चांगलाच पाऊस पडणार आहे. तसेच सांगली, धाराशिव, सोलापूर, लातूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, जालना, नांदेड या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.