Weather Update | जुलै महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला. परंतु ऑगस्ट उजाडल्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसत आहे. अशातच आता हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिलेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस (Weathe Update) कोसळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी वादळी वारा आणि विजा देखील कडकडणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. यासोबतच पुण्यातील काही भागांमध्ये आज वादळी वारासह पावसाची (Weather Update) हजेरी लागणार असल्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे पुण्याला देखील आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मुंबईमध्ये आज पाऊस (Weather Update) नसला, तरी संपूर्णपणे ढगाळ वातावरण असणार आहे. त्यामुळे येथील तापमान देखील वाढणार आहे. मुंबईत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस एवढे असणार आहे. हवामान विभागाने नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड, हिंगोली, परभणी, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये देखील येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज दुपारपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. मागील 24 तासांमध्ये मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 8 तास काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस कोसळणार आहे. पुढील आठवडाभर पावसाचा हा जोर कायम असणार आहे. सध्या अनेक शेतकरी हे शेतात पिकाला खत देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणार आहे.