Weather Update | यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे. त्यामुळे अनेक नदी, नाले, धरणे देखील ओसंडून वाहत आहेत. परंतु त्यानंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतली आणि आता राज्यात पुन्हा एकदा पाऊसची सुरुवात झालेली आहे. गेल्या दोन दिवसापासून संध्याकाळच्या वेळी चांगलाच पाऊस पडताना दिसत आहे. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडलेला आहे. अशातच हवामान विभागाने आज देखील पावसाची (Weather Update) शक्यता वर्तवलेली आहे.
हवामान विभागाने पावसाबद्दलची शक्यता वर्तवलेली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारपासून पुढील चार-पाच दिवस राज्यांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबद्दल हवामान विभागाचे प्रमुख डॉक्टर कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून माहिती दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 18 ऑगस्टपासून पुढील चार-पाच दिवस राज्यात मेघगरजेनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच या पावसाचा जोरदार वारे असणार आहे आणि विजा पडण्याची देखील शक्यता वर्तवलेली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारे देखील वाहणार आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, कोकण या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.
त्याचप्रमाणे आज कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात देखील पाऊस पडेल. तसेच अहमदनगर, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. येत्या चार-पाच दिवसात मराठवाड्यात देखील पावसाची शक्यता आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे. काही दिवसाचा ब्रेक घेतल्यानंतर आता पाऊस पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार कोसळण्यासाठी तयार झालेला आहे.