Weather Update | विश्रांतीनंतर पुन्हा बरसणार वरुणराजा; ‘या’ जिल्ह्यांना दिला रेड अलर्ट

Weather Update
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Weather Update | मागील आठवड्यात राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. परंतु पावसाने 2 दिवस विश्रांती घेतली आणि राज्यात पुन्हा एकदा चांगलाच पाऊस चालू झालेला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभाग हे दररोज पावसाबद्दलचा अंदाज व्यक्त करत आहे. आज देखील हवामान विभागाने 2 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्रात हवामानाचा अंदाज कसा असेल? हे सांगितलेले आहे.

हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील काही भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आज पहाटेपासूनच अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्यास सुरुवात देखील झालेली आहे. पुण्यातील घाट माथ्यावर अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये देखील हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. आज सातारा जिल्ह्यात मात्र मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आव्हान दिलेले आहे. या जिल्ह्याचा आज रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. घाटमाथ्यावर अति मुसळधार स्वरूपाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे.

आज कोल्हापूरमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. घाटमाथ्यावर अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये आज ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे वादळीवारा देखील या भागात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे.