Weather Update | महाराष्ट्रात मान्सूनला सुरुवात झाल्यानंतर काही काळ खंड पडला होता. परंतु आता पुन्हा एकदा राज्यामध्ये मान्सून सक्रिय झालेला आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये देखील मान्सूनला मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार आता नैऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी पोषक असे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामुळे पुढील 48 तासात जोरदार पावसाचा (Weather Update) इशारा देण्यात आलेला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आता येत्या 24 तासांमध्ये विदर्भात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. तसेच विदर्भतील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसासह (Weather Update) वादळीवारा पाहायला मिळणार आहे. यावेळी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असल्याची माहिती देखील दिलेली आहे.
विदर्भसह कोकणाला देखील मुसळधार पावसाचा (Weather Update) मारा बसणार आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि या ठिकाणाला येलो अलर्ट देखील दिलेला आहे. तसेच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे या वीकेंडला जर तुम्ही कोकणात जाण्याचा प्लान करत असाल, तर काहीही काळजी घेऊनच प्लॅन करा. कारण या वीकेंडला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आता येत्या 24 तासामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर,पुणे ठाणे, सातारा या ठिकाणी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमरावती, गडचिरोली, यवतमाळ या ठिकाणी देखील चांगलाच पाऊस पडणार असल्याचा सांगितले आहे. पाऊस सुरू झाला की अनेक लोक ट्रेकिंगला जातात. परंतु प्रशासनाने या लोकांना काळजी घेऊन ट्रेकिंग करण्यास किंवा फिरण्यास सांगितलेले आहे. कारण कोणत्याही कृतीमुळे जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आव्हान प्रशासनाकडून देण्यात आलेले आहे.