Weather Update | सध्या राज्यातील हवामानात मोठ्या प्रमाणात बदल झालेले पाहायला मिळत आहे. कधी उन्हामुळे अत्यंत गरम होताना दिसत आहे, तर कधी कधी पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहे. गणपतीनंतर पावसाने राज्यात काहीसा आराम केला होता. परंतु आता पुन्हा एकदा राज्यात मान्सून आगमन होणार आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा जोर देखील वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे. हवामान विभाग पावसाबाबत नेहमीच अपडेट देत असतात. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. .
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 23 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे पावसासाठी हे पोषक वातावरण आहे. त्यामुळे रविवारपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांना अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. तसेच खरीप हंगामातील शेतकऱ्यांची जी पीके आहे ते त्या पिकांची काळजी घेण्याचे देखील सांगण्यात आलेले आहे.
हवामान खात्याने बनवलेल्या अंदाजानुसार आज म्हणजेच 21 सप्टेंबर रोजी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सगळ्या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, लातूर तसेच धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना देखील काळजी घेण्याचे सांगण्यात आलेले आहे.
मुंबई सह उपनगरामध्ये देखील आज पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात देखील काहीशा प्रमाणात पाऊस पाहायला मिळणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना पावसाचा विभागाकडून वर्तवण्यात येईल आलेला आहे. येथे मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमध्ये देखील तीन दिवसात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.