Weather Update | बऱ्याच काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पावसाने पुन्हा एकदा राज्यात जोरदार हजेरी लावलेली आहे. गेल्या दोन-चार दिवसापासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पावसासाठी पोषक असे वातावरण तयार झाले आणि राज्यातील विविध ठिकाणी पाऊस पडताना दिसत आहेत. अशातच आता हवामान विभागाने विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दिवसांमध्ये मुसळधार स्वरूपाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे हवामान विभागाने आज म्हणजे 24 सप्टेंबर रोजी पावसाचा (Weather Update) अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात येलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाडा आणि कोकण किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच या ठिकाणावरील लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला देखील दिलेला आहे.
हवामान विभागाला दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये आहे. म्यानमारच्या किनारपट्टीवरील हवेची चक्रीय स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे बंगालच्या सगळ्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन महाराष्ट्राच्या दिशेने वारे येत, असल्याने मराठवाडा आणि विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस (Weather Update) पडणार आहे.
दरवर्षी सामान्यता मान्सून हा 17 सप्टेंबरच्या आसपास माघारी फिरत असतो. परंतु 23 सप्टेंबरपर्यंत किंवा त्यानंतरही कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच आणखी पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. त्याचप्रमाणे कोकणात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये देखील पाऊस (Weather Update) पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर सातारा मराठवाड्यात परभणी, बीड, हिंगोली नांदेड या ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे.
त्याचप्रमाणे 25 सप्टेंबरला देखील रायगड जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच 26 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.