Weather Update | सध्या संपूर्ण राज्यामध्ये अति मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. हवामान विभागाने देखील अनेक जिल्ह्यांबाबत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अशातच हवामान विभागाने (Weather Update) आज म्हणजे 22 जुलै 2024 रोजी पावसाचा अंदाज कसा असणार आहे? हे सांगितलेले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज पुण्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस (Weather Update) पडणार आहे. त्यामुळे आज पुणे विभागाला आज येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे घाट माथ्यावर देखील अति मुसळधार पाऊस पडेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
मुंबईमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे आज देखील मुंबईमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार, असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आज मुंबईमधील कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 22°c असणार असल्याचे सांगण्यात आलेले आहे. आज अनेक ठिकाणी मुसळधार पावसासह विजा आणि वादळीवारा देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांना वाऱ्याच्या संकटाचा देखील सामना करावा लागणार आहे.
त्याचप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये देखील अति मुसळधार (Weather Update) पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या विभागाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या विभागांना येल्लो अलर्ट जारी केला आहे.